सार
Raksha Bandhan 2024 DIY Rakhi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन येत्या 19 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनाचा स्वत: तयार केलेली स्पेशल राखी बांधून त्याला खूश करा.
Raksha Bandhan 2024 DIY Rakhi : वर्षभर काही सण-उत्सव साजरे केले जातात. यापैकी काही विशेष सण असतात. यापैकीच एक म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमा. या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाला बहिणीकडून भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. यंदा रक्षाबंधनाचा सण येत्या 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या वेळी भावाला स्वत: तयार केलेली राखी बांधा. यासाठीचे पुढील काही DIY राखी व्हिडीओ नक्की पाहा.
रक्षाबंधनासाठी पेपर क्राफ्टपासून तयार करा राखी, पाहा व्हिडीओ
दोऱ्यापासून तयार करा DIY राखी, पाहा व्हिडीओ
भावासाठी तयार करा स्पेशल राखी, पाहा VIDEO
लोकरीच्या दोऱ्यापासून तयार करा राखी, पाहा व्हिडीओ
रक्षाबंधनावेळचा शुभ मुहूर्त
- रक्षाबंधनाच्या अनुष्ठानची वेळ : दुपारी 1.30 ते रात्री 9.06 वाजेपर्यंत
- राखी बांधण्याची वेळ : दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी ते दुपारी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंत
- रक्षाबंधनावेळचा प्रदोष काळ मुहूर्त : संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी ते रात्री 09 वाजून 07 मिनिटांपर्यंत
आणखी वाचा :
Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधानंतर हातातून राखी काढताना चुकूनही करू नका या चुका
Raksha Bandhan 2024 निमित्त बहिण-भावाला खास Wishes, Messages पाठवून साजरा करा सण