सार

Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासह काढण्याचेही काही नियम आहेत. याचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे मानले जाते. याबद्दलच जाणून घेऊया.

Raksha Bandhan 2024 : भावाबहिणीमधील अतूट प्रेम, कर्तव्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण प्रत्येक श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणीकडून भावाची ओवाळणी करत त्याच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यानंतर भावाकडून बहिणीला गिफ्ट दिले जाते. याशिवाय बहिण भावाला त्याला आयुष्यभर कठीण काळात पाठीशी उभी राहण्याचे वचन देते.

यंदा रक्षाबंधनाचा सण येत्या 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी भद्राकाळ असणार आहे. यामुळे भावाला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनंतर राखी बांधता येणार आहे. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो. रक्षाबंधनाला राखी बांधली जाते. पण काहीजण दुसऱ्या दिवशी हातातील राखी काढून टाकतात. शास्रानुसार, हातातील राखी फेकून देणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊया रक्षाबंधनानंतर राखी हातातून काढण्यासाठी काय नियम आहेत याबद्दल अधिक.

रक्षाबंधनावेळचा शुभ मुहूर्त

रक्षाबंधनाच्या अनुष्ठानची वेळ : दुपारी 1.30 ते रात्री 9.06 वाजेपर्यंत

राखी बांधण्याची वेळ : दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी ते दुपारी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंत

रक्षाबंधनावेळचा प्रदोष काळ मुहूर्त : संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी ते रात्री 09 वाजून 07 मिनिटांपर्यंत

रक्षाबंधननंतर राखीचे काय करावे?

  • रक्षाबंधनानंतर राखी कमीत कमी 21 दिवस हातात राहू द्यावी. जर तुम्ही 21 दिवस राखी बांधू शकत नसाल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवसापर्यंत ठेवा.
  • राखी काढल्यानंतर लाल रंगातील कापडात गुंडाळून बहिणीच्या जेथे वस्तू असतात तेथे ठेवू शकता. अथवा एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा.
  • राखी कधीच फेकून देऊ नये. राखी पाण्याच्या प्रवाहात वाहू शकता.
  • राखी हातातून काढताना ती तुटल्यास एखाद्या झाडाखाली ठेवा.

राखी बांधताना तोंड कोणत्या दिशेला असावे?
राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला तर बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावे. यानंतर भावाची ओवाळणी करुन त्याला राखी बांधावी.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

रक्षाबंधनानंतर या 3 राशींच्या समस्यांमध्ये होणार वाढ, धन हानिचीही शक्यता

Raksha Bandhan 2024 साठी हटके आणि ट्रेण्डी राखी डिझाइन, भाऊ होईल खूश