Pushya Nakshatra 2025 : यंदा दिवाळीपूर्वी 14 ऑक्टोबर रोजी मंगल पुष्य योग जुळून येत आहे. हा योग खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. जाणून घ्या या शुभ योगात काय खरेदी केल्याने तुमचे नशीब उजळू शकते?

Pushya Nakshatra 2025 : दरवर्षी दिवाळीपूर्वी पुष्य नक्षत्राचा योग जुळून येतो. यंदा पुष्य नक्षत्र १ नाही तर २ दिवस असणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही दिवस खरेदीसाठी खूप शुभ असतील. १४ ऑक्टोबर, मंगळवारी पुष्य नक्षत्र दुपारी ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होईल, जे दिवसभर राहील. त्यामुळे या संपूर्ण दिवशी खरेदी करता येईल. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रवीण द्विवेदी यांच्याकडून जाणून घ्या मंगल पुष्य नक्षत्रात काय खरेदी करावे आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्ताची माहिती..

१४ ऑक्टोबर, मंगळवार खरेदी मुहूर्त

सकाळी ०९:२० ते १०:४६ पर्यंत
सकाळी १०:४६ ते दुपारी १२:१२ पर्यंत
दुपारी ११:४९ ते १२:३५ पर्यंत
दुपारी १२:१२ ते ०१:३९ पर्यंत
दुपारी ०३:०५ ते ०४:३२ पर्यंत

पुष्य नक्षत्रात सोने खरेदी करणे शुभ

पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह आहे. गुरूचा धातू सोने आहे. त्यामुळे पुष्य नक्षत्रात सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की पुष्य नक्षत्रात खरेदी केलेले सोने दीर्घकाळ उपयोगी ठरते आणि घरात सुख-समृद्धी वाढवते.

पुष्य नक्षत्रात जमीन-घर देखील खरेदी करू शकता

पुष्य नक्षत्राचा संबंध शनीशीही आहे. शनी स्थायी मालमत्ता देतो. त्यामुळे पुष्य नक्षत्रात जमीन-घर खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्रात खरेदी केलेली मालमत्ता कमी वेळेत जास्त फायदा देणारी मानली जाते. त्यामुळे पुष्य नक्षत्रात जमीन, घर, दुकान इत्यादी खरेदी करू शकता.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी देखील शुभ

पुष्य नक्षत्रात टीव्ही, फ्रीज, कूलर, एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या सर्व वस्तू शनीशी संबंधित मानल्या जातात. पुष्य नक्षत्रात या वस्तूंची खरेदी केल्यास त्या लवकर खराब होत नाहीत आणि दीर्घकाळ टिकतात.

घराच्या सजावटीचे सामानही खरेदी करू शकता

दिवाळीपूर्वी लोक घराच्या सजावटीच्या वस्तूही खरेदी करतात. या वस्तू जर पुष्य नक्षत्रात खरेदी केल्या तर त्यांचे महत्त्व आणखी वाढते. पुष्य नक्षत्राच्या शुभतेमुळेच त्याला नक्षत्रांचा राजा असेही म्हणतात. या नक्षत्रात खरेदी केलेली प्रत्येक वस्तू खूप शुभ फळ देते.


(DISCLAIMER : या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेण्यात आली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे केवळ एक माध्यम आहोत. वापरकर्त्यांनी या माहितीला केवळ सूचना मानावे.)