Diwali 2025 : दिवाळीपूर्वी घरात लावा ही 5 झाडे, येईल सुख-समृद्धी
Diwali 2025 : दिवाळीत फक्त दिवे लावणं पुरेसं नाही. असं मानलं जातं की घरात पांढरा पळस, क्रासुला, मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि तुळस यांसारखी झाडं लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ही झाडं वास्तुदोष दूर करतात.

दिवाळी कधी साजरी केली जाते?
दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी होते. या दिवशी लक्ष्मी-गणेश पूजन आणि दीपोत्सव असतो. दिवाळीपूर्वी घरात काही खास झाडं लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा होते. जाणून घेऊया कोणती झाडं लावावीत.
पांढरा पळस
पांढऱ्या पळसाचं झाड रोगांपासून मुक्ती देतं असं मानलं जातं. याला देवी लक्ष्मीचं झाडही म्हणतात. घरात लावल्यास धन, समृद्धी वाढते. हे झाड घरात सकारात्मक वातावरण ठेवतं आणि वास्तुदोष कमी करतं.
क्रासुलाचं झाड
याला 'जेट प्लांट' असंही म्हणतात. घर आणि ऑफिसमध्ये सौभाग्य व समृद्धीसाठी हे खूप शुभ मानलं जातं. क्रासुलाचं झाડ लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि पैशांमध्ये वाढ होते, असं मानलं जातं.
मनी प्लांट
मनी प्लांट घर आणि ऑफिसमध्ये धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतो असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, जिथे हे झाड असतं, तिथे देवी लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते आणि घरात सुख-शांती आणते.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांट नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात शांतता व संतुलन राखतो. हे झाड घराच्या मुख्य दारावर ठेवणं शुभ मानलं जातं. हे झाड पैसा आकर्षित करतं आणि नोकरी-व्यवसायात प्रगती घडवतं.
तुळशीचं रोप
तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप आणि भगवान विष्णूची प्रिय मानलं जातं. घरात तुळशीचं रोप लावणं धार्मिक, आरोग्य आणि वास्तुच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानलं जातं.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

