सार

व्हेलेंटाइन वीकमधील पाचव्या दिवशी म्हणजेच 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जात आहे. यानिमित्त पार्टनरची आयुष्यभरासाठी साथ कायम राहण्यासाठी काही वचने नक्की देऊ शकता.

Promise Day 2025 : आज जगभरात प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी) साजरा केला जात आहे. प्रॉमिस डे निमित्त कपल्स आपल्या पार्टनरसोबत आयुष्यभर एकत्रित राहण्याचे वचन एकमेकांना देतात. याशिवाय काही कपल्स रिलेशनशिपला नवे नाव देण्यासाठी लग्नाचे वचन देतात. एवढेच नव्हे पती-पत्नी एकमेकांना त्यांच्या नात्यात कायम गोडवा टिकून राहण्यासाठी काही वचने देतात. जेणेकरुन एकमेकांवरील प्रेम नेहमीच वाढत राहिल. जाणून घेऊया प्रॉमिस डे निमित्त पार्टनरला तुम्ही कोणती 3 वचने देऊ शकता याबद्दल सविस्तर...

आदर देण्याचे वचन

प्रेमात एकमेकांवर प्रेम करावेच पण एकमेकांचा आदरही करणे फार महत्वाचे आहे. दोघांनीही आदराने एकमेकांना वागवावे. कारण एका पार्टनरवर अविश्वास दाखवून त्याचा आदर केला नाही तर नात्यात वाद होऊ शकतात. अशातच यंदाच्या प्रॉमिस डे वेळी पार्टनरला एकमेकांचा आदर करण्याचे वचन देऊ शकता.

एकमेकांना वेळ देण्याचे वचन

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला पुरेसा वेळ नसतो. याचा परिणाम नात्यांवरही झालेला दिसतो. अशातच नातेसंबंध बिघडू लागतात. यामुळे खासगी आणि प्रोफेशनल लाइफ एकमेकांपासून वेगळे ठेवावे. जेणेकरुन आयुष्यातील खास व्यक्तींना वेळ देता येईल.

हेही वाचा : 

वचन देईल सजना, promise day ला तुमच्या प्रियकराला पाठवा संदेश

फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच अंकशास्त्र काय सांगत?

एकमेकांना पाठिंबा देणे

प्रत्येक पार्टनरला दुसऱ्या पार्टनरचा पाठिंबा हवा असतो. आयुष्यातील कोणत्याही स्थितीत पार्टनर आपल्यासोबत असावा असे वाटत असते. जेणेकरुन नाते अधिक घट्ट होईल. अशातच यंदाच्या प्रॉमिस डे निमित्त पार्टनरला आयुष्यात कोणत्याही स्थितीत पाठिंबा देण्याचे वचन देऊ शकता.