सार
चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. पण वयाधीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असल्यास काही उपाय करू शकता. यासाठी बटाट्याचा रस बेस्ट पर्याय ठरू शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Potato Juice for Wrinkles : प्रत्येकाला आपली त्वचा ग्लोइंग आणि चमकदार दिसावी असे वाटत असते. पण चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे सौंदर्य खुलले जात नाही अशी तक्रार केली जाते. सर्वसामान्यपणे वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. पण वयाआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात झाली असल्यास बटाट्याचा रसाचा वापर करू शकता. बटाट्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन बी6 आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेला ग्लो येण्यासह स्किन टोन सुधारला जातो.
बटाट्याचा रस आणि मध
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसामध्ये मध मिक्स करुन चेहऱ्याला लावा. यासाठी 2-3 चमचे बटाट्याचा रस घेऊन त्यामध्ये अर्धा टिस्पून मध मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेच्या आजूबाजूला लावून 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. बटाट्याच्या रसामध्ये मध मिक्स केल्याने सुरकुत्या कमी होण्यासोबत त्वचा ग्लो होईल.
बटाट्याचा रस आणि दूध
चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाइन लाइन्स असल्यास बटाट्याच्या रसामध्ये दूध मिक्स करुन लावू शकता. यासाठी एका वाटीत बटाट्याच्या रसामध्ये दूध आणि ग्लिसरीन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला 15-20 मिनिटे लावून ठेवा आणि धुवा.
बटाट्याचा रस आणि हळद
चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसामध्ये हळद मिक्स करा. यासाठी 2-3 चमचे बटाट्याचा रस घेऊन त्यामध्ये हळद मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवा.
बटाटा आणि टोमॅटोचा रस
एजिंगची लक्षणे दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसामध्ये टोमॅटोचा रस मिक्स करुन त्वचेला लावू शकता. यासाठी बटाट्याच्या रसामध्ये 1 चमचा टोमॅटोचा रसही मिक्स करा. चेहऱ्या 10 मिनिटे रस लावून ठेवल्यानंतर धुवा. बटाटा आणि टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने त्वचा फ्री रेडिकल्सपासून दूर राहते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
नाइट स्किन केअरसाठी 5 नियम, वयाच्या 45 व्या वर्षीही दिसाल तरुण