शूज दीर्घकाळ घातल्याने पायांपर्यंत हवा पोहोचली जात नाही. अशातच घाम आणि बॅक्टेरिया जमा होऊन दुर्गंधी येऊ लागते. यामुळे पायांना फंगस व बॅक्टेरियाची समस्या उद्भवली जाऊ शकते.
पायांना येणाऱ्या दुर्गंधीमुळे चारचौघांमध्ये उभे राहून बोलताना लाज वाटते. याशिवाय पाय स्वच्छ धुतल्यानंतरही दुर्गंधी येते. यावर उपाय काय पुढे जाणून घेऊया.
पायाला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस, लेमन ग्रास ऑइल आणि बेसन मिक्स करुन पेस्ट तयार करा.
बेकिंग सोड्याचा मास्क लावण्यासाठी सर्वप्रथम पाय स्वच्छ धुवा. यानंतर पायांना 15 मिनिटे पेस्ट लावून ठेवा. यावेळी पायांना हलक्या हाताने मसाजही करा. पाय स्वच्छ धुवून मॉइश्चराइजर लावा.
फूट सोक तयार करण्यासाठी कोमट गरम पाणी घ्या. यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा, मीठ आणि नारळाचे तेल मिक्स करा. या मिश्रणात 15 मिनटे पाय बुडवून ठेवल्यानंतर साबणाने पाय स्वच्छ धुवा.
पायांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी दररोज पाय स्वच्छ धुवावेत. याशिवाय दीर्घकाळ शूज घालून बसू नये.
पायांची दुर्गंधी दूर करण्यासाठी मोजे घालण्यापूर्वी पायांना टॅल्कम पावडर लावा. यामुळे घाम किंवा बॅक्टेरियाची समस्या कमी होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.