MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Tattoo Meaning : 10 लोकप्रिय टॅटू डिझाईन्सचा अर्थ माहितीये का? प्रत्येक डिझाईनमागे दडलीये खास गोष्ट

Tattoo Meaning : 10 लोकप्रिय टॅटू डिझाईन्सचा अर्थ माहितीये का? प्रत्येक डिझाईनमागे दडलीये खास गोष्ट

Tattoo Meaning: हार्ट, बटरफ्लाय, इन्फिनिटी, फेदर आणि सिंह अशा १० लोकप्रिय टॅटू डिझाईन्सचा नेमका अर्थ काय असतो, ते आपण जाणून घेणार आहोत. प्रेम, धैर्य, स्वातंत्र्य, आशा आणि अध्यात्म अशा अनेक भावना हे टॅटू व्यक्त करतात. याबद्दलची रंजक माहिती

4 Min read
Author : Karishma R
Published : Oct 23 2026, 12:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
111
टॅटूचा नेमका अर्थ काय असतो?
Image Credit : Gemini Ai

टॅटूचा नेमका अर्थ काय असतो?

शरीरावर एखादा छोटा टॅटू काढला असेल, तर तो फक्त सौंदर्यासाठी असतो का? हातावरचं फुलपाखरू, मनगटावरचं हार्ट, बोटावरचं इन्फिनिटी चिन्ह अशा प्रत्येक टॅटूमागे एखादी आठवण, भावना किंवा वैयक्तिक गोष्ट असू शकते.

काही लोक आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ टॅटू काढतात. तर काही जण आपला आत्मविश्वास दाखवण्यासाठी आणि आयुष्यातील संघर्षाची आठवण म्हणून टॅटूची निवड करतात. पण सध्या ट्रेंडिंग असलेल्या या टॅटू डिझाईन्सचा खरा अर्थ तुम्हाला माहितीये का?

दिसायला सुंदर असलेल्या १० लोकप्रिय टॅटू डिझाईन्स आणि त्यांचा अर्थ आपण सविस्तर पाहूया. कदाचित तुम्हालाही तुमच्या पुढच्या टॅटूसाठी इथून एखादी भन्नाट आयडिया मिळेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
211
टॅटू १
Image Credit : Gemini Ai

टॅटू १

सेमीकोलन टॅटू (Semi colon - ; )

आयुष्य संपलंय असं वाटत असतानाही प्रवास सुरूच राहतो, याचं प्रतीक म्हणून अनेक जण सेमीकोलन (;) टॅटू पाहतात.

एखादं वाक्य न संपता पुढे चालू राहतं, तसंच आयुष्यातही आव्हानांवर मात करून आपण नवीन अध्याय सुरू करू शकतो, असा विश्वास हा टॅटू देतो.

विशेषतः मानसिक धैर्य, आशा आणि आयुष्य पुढे नेण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी लोक हा टॅटू निवडतात.

हे चिन्ह छोटं असलं तरी, "माझी गोष्ट अजून संपलेली नाही" असा भक्कम संदेश हा टॅटू देतो.

Related Articles

Related image1
Duplicate Branded Products : ब्रँडेडच्या नावाखाली डुप्लिकेट वस्तूंचा सुळसुळाट.. खरेदी करताना कशी घ्याल काळजी?
311
टॅटू २
Image Credit : Gemini Ai

टॅटू २

आर्म बँड टॅटू (Arm Band Tattoo)

हातात एखादं कडं घातल्यासारखा, दंडावर किंवा मनगटावर गोल आकारात काढला जाणारा टॅटू म्हणजे आर्म बँड टॅटू.

हा टॅटू ताकद, एकता, निश्चय आणि आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीसोबतचं घट्ट नातं दर्शवतो. काही लोक आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची आठवण म्हणूनही हा टॅटू काढतात.

411
टॅटू ३
Image Credit : Gemini Ai

टॅटू ३

सन टॅटू (Sun Tattoo)

अंधार दूर करून प्रकाश देणाऱ्या सूर्याप्रमाणेच, आयुष्यातही आशेने पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सन टॅटू एकदम परफेक्ट आहे.

सूर्य हा ऊर्जा, आशा, ताकद आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. आयुष्यात सकारात्मक विचार ठेवणारे आणि आत्मविश्वास दाखवू इच्छिणारे लोक हा टॅटू निवडू शकतात.

आयुष्यात कितीही अंधार असला तरी, नवी पहाट नक्कीच होईल, याची आठवण करून देणारा हा एक सुंदर टॅटू आहे.

511
टॅटू ४
Image Credit : Gemini Ai

टॅटू ४

ॲरो टॅटू (Arrow Tattoo)

बाण जसा नेहमी एका विशिष्ट दिशेने जातो, तसाच हा टॅटू ध्येय गाठण्यासाठीचे प्रयत्न, प्रगती आणि दृढनिश्चय दर्शवतो. आयुष्यात सतत पुढे जाण्याची इच्छा असणारे लोक हा टॅटू निवडू शकतात.

ॲरो टॅटू ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं, लक्ष केंद्रित करणं आणि अडथळ्यांवर मात करणं या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो. काही लोक आपल्या आयुष्याचं ध्येय विसरू नये आणि आपण किती प्रगती केलीये, याची आठवण राहावी म्हणून हा टॅटू काढतात.

611
टॅटू ५
Image Credit : Gemini Ai

टॅटू ५

हार्ट टॅटू (Heart Tattoo)

हार्ट शेप टॅटू प्रेम, जिव्हाळा आणि जवळच्या नात्यांच्या आठवणी कायम सोबत ठेवू इच्छिणाऱ्यांची पहिली पसंती असतो. फक्त जोडीदाराच्याच नाही, तर आई-वडील, कुटुंब आणि मित्रांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठीही हार्ट टॅटूची मदत होते.

छोटं हार्ट, डबल हार्ट, नाव असलेलं हार्ट अशा अनेक डिझाईन्समध्ये हा टॅटू काढता येतो. दिसायला साधा असला तरी, यामागे खूप खोल भावना दडलेल्या असतात.

711
टॅटू ६
Image Credit : Gemini Ai

टॅटू ६

बटरफ्लाय टॅटू (Butterfly Tattoo)

आयुष्यात कितीही अडथळे आले तरी, एक दिवस आपण नक्कीच उंच भरारी घेऊ शकतो, याची आठवण करून देणारं हे एक सुंदर प्रतीक आहे.

अळीपासून सुरू होऊन रंगीबेरंगी फुलपाखरू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास, बदल आणि नवीन सुरुवातीचं प्रतिनिधित्व करतो.

आयुष्यातील कठीण प्रसंग पार करून नवीन मार्गावर चालू इच्छिणारे लोक हा टॅटू निवडू शकतात. मुक्तपणे जगण्याची इच्छा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ओढ हा टॅटू व्यक्त करतो.

तुमच्या आयुष्यातील बदल आणि नवीन सुरुवातीची आठवण करून देणारा हा एक सुंदर टॅटू आहे.

811
टॅटू ७
Image Credit : Gemini Ai

टॅटू ७

लायन टॅटू (Lion Tattoo)

सिंह हा ताकद, धैर्य आणि नेतृत्व गुणांचं प्रतीक मानला जातो. आयुष्यात कितीही मोठी आव्हाने आली तरी त्यांना धैर्याने सामोरं जाण्याची आणि नेहमी आत्मविश्वासाने राहण्याची इच्छा असणारे लोक हा टॅटू निवडू शकतात.

नेतृत्व क्षमता आणि मानसिक कणखरपणा दाखवू इच्छिणाऱ्यांसाठीही ही एक उत्तम डिझाईन आहे.

911
टॅटू ८
Image Credit : Gemini Ai

टॅटू ८

इन्फिनिटी टॅटू (Infinity Tattoo)

अथांग प्रेम, कधीही न बदलणारी मैत्री आणि काळाच्या पलीकडे टिकणारं नातं अशा खोल भावनांचं प्रतीक म्हणजे इन्फिनिटी टॅटू.

आठ या अंकाला आडवं केल्यासारखं दिसणारं हे चिन्ह, अनंत काळ आणि सातत्य दर्शवतं. फक्त प्रेमसंबंधच नाही, तर कुटुंबावरील प्रेम, मैत्री आणि आयुष्यात कायम टिकून राहावी अशी वचने व्यक्त करण्यासाठी अनेक जण हा टॅटू निवडतात.

नावासोबत इन्फिनिटी, हार्टसोबत जोडलेली डिझाईन किंवा पिसांसोबत अशा अनेक प्रकारे हा टॅटू काढता येतो. आयुष्यात कितीही बदल झाले तरी प्रेम आणि नाती कायम राहतील, याची आठवण हा टॅटू करून देतो.

1011
टॅटू ९
Image Credit : Gemini Ai

टॅटू ९

फिनिक्स बर्ड टॅटू (Phoenix Tattoo)

अपयशाने खचून न जाता, राखेतून पुन्हा भरारी घेणारा पक्षी म्हणून फिनिक्स ओळखला जातो. हा पक्षी पुनर्जन्म, आशा आणि दृढनिश्चयाचं प्रतीक आहे.

कठीण अनुभवांवर मात करून नवीन आयुष्य सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा टॅटू एकदम योग्य आहे. पडलो तरी पुन्हा उभं राहता येतं, याची आठवण करून देणारा हा टॅटू तुमच्या आयुष्यातील संघर्षाच्या विजयाचं प्रतीक बनू शकतो.

1111
टॅटू १०
Image Credit : Gemini Ai

टॅटू १०

फेदर टॅटू (Feather Tattoo)

फेदर म्हणजेच पिसाचा टॅटू साधारणपणे स्वातंत्र्य, हलकं मन, आशा आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडण्याच्या इच्छेशी जोडला जातो. काही लोक आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थही हा टॅटू काढतात.

स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगू इच्छिणाऱ्या आणि वेगळेपण जपू पाहणाऱ्या लोकांसाठी हा टॅटू योग्य आहे. तुमच्या स्वप्नांना पंख देऊन अडथळे पार करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी फेदर टॅटू हा एक सुंदर पर्याय ठरू शकतो.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
1st T20 • NZ vs IND 2026
Result
NZNZ
225/4
INDIND
230/6
IND beat NZ by 4 wickets
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
Result
SASA
425/9
AUSAUS
99 & 295
SA beat AUS by 31 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
02:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
5th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sun, 1 Nov, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Gold Locket : १ ग्रॅममध्ये मिळणारे हे सोन्याचे लॉकेट्स पाहा, डिझाईन्स खूपच सुंदर आहेत!
Recommended image2
Diabetes Diet : शुगरच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे ७ पदार्थ
Recommended image3
Water Heater : रोज वॉटर हीटर वापरताय? मग या 7 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर धोका अटळ आहे
Recommended image4
Kids Bangles : लहान मुलांच्या हातांना रॉयल लूक देणाऱ्या बांगड्यांच्या डिझाईन्स
Recommended image5
Mercury Retrograde 2026 : बुध वक्री होणार, या 4 राशींचे नशीब फळफळणार
Related Stories
Recommended image1
Duplicate Branded Products : ब्रँडेडच्या नावाखाली डुप्लिकेट वस्तूंचा सुळसुळाट.. खरेदी करताना कशी घ्याल काळजी?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved