Mercury Retrograde 2026 : बुध वक्री होणार, या 4 राशींचे नशीब फळफळणार
Mercury Retrograde 2026: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला शिक्षण, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि व्यापाराचा कारक मानलं जातं. येत्या २०२६ मध्ये २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात बुध वक्री अवस्थेत असणार आहे. याचा ४ राशींवर कसा सकारात्मक परिणाम होईल?

बुध वक्री झाल्याने या राशींना होणार फायदा
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, शिक्षण, संवाद, गणित आणि व्यापाराचा कारक मानलं जातं. बुध जेव्हा वक्री होतो, तेव्हा जुन्या कामांचा आढावा घेणं, जुन्या योजना दुरुस्त करणं आणि निर्णयांचा पुनर्विचार करणं महत्त्वाचं ठरतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. पंचांगानुसार, २०२६ मध्ये २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात बुध वक्री राहील. त्यानंतर १३ नोव्हेंबरला बुध पुन्हा मार्गी होईल.

तूळ राशीशी काय आहे संबंध?
भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या बदलाचा संबंध तूळ राशीशी जोडला जातो. तर पाश्चात्य ज्योतिषशास्त्रानुसार याच काळात बुध वृश्चिक राशीत वक्री होत असल्याचं मानलं जातं. त्यामुळे राशींच्या नावातील हा फरक वापरल्या जाणाऱ्या ज्योतिष पद्धतीवर अवलंबून असतो. हा बदल काही राशींसाठी खूप सकारात्मक ठरू शकतो, असा अंदाज ज्योतिषांनी वर्तवला आहे.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात मेष राशीचे लोक त्यांच्या आर्थिक योजनांचा पुनर्विचार करू शकतात. अडकलेले पैसे, व्यावसायिक करार किंवा नोकरीशी संबंधित वाटाघाटींमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी अटी नीट वाचून घ्याव्यात. अचानक पैसे मिळतील या आशेवर खर्च वाढवण्यापेक्षा बजेटनुसार चालणं महत्त्वाचं आहे. जुन्या चुका सुधारण्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी तुम्ही या वेळेचा वापर करू शकता.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक सुधारून कमकुवत विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेले तरुण त्यांचे रेझ्युमे अपडेट करून मुलाखतीची तयारी करू शकतात. नवीन कौशल्य शिकायचं असेल तर योग्य प्रशिक्षण निवडून सराव सुरू करा. नात्यातील गैरसमज संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. जुन्या आर्थिक समस्या आपोआप सुटतील असा विचार न करता, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कर्जाची परतफेड करण्यावर भर द्या.
तूळ
बुधाच्या या बदलाचा तूळ राशीशी थेट संबंध असल्याने, या राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य, नातेसंबंध आणि व्यावसायिक निर्णयांवर मोठा प्रभाव पडेल. ऑफिसमध्ये तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्यावर, जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधण्यावर आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. व्यावसायिक लोक नवीन ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. घर किंवा वाहन खरेदीसारखे मोठे निर्णय घेताना उत्पन्न, कर्ज आणि बचत यांचा नीट ताळमेळ बसवा. लॉटरी किंवा शेअर बाजारात फायदा होईल या अंदाजांवर विसंबून पैसे गुंतवणे धोक्याचे ठरू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीवर हा काळ लक्ष केंद्रित करेल. बहुप्रतिक्षित पदोन्नती, नवीन नोकरीसाठी प्रयत्न किंवा परदेशात नोकरी शोधण्याच्या योजनांचा तुम्ही पुन्हा आढावा घेऊ शकता. वरिष्ठांशी बोलताना तुमच्या कामाची प्रगती आणि यश स्पष्टपणे सांगा. जुन्या गुंतवणुकीचा किंवा बचतीचा तुम्ही पुन्हा विचार करू शकता. उत्पन्न दुप्पट होईल किंवा परदेशात नक्की संधी मिळेल, असा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे कौशल्य विकास, नोकरीचे अर्ज आणि आर्थिक शिस्त यावर लक्ष केंद्रित करणे अधिक व्यावहारिक ठरेल. आरोग्याची काही समस्या असल्यास केवळ ज्योतिषावर अवलंबून न राहता योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.








