Pitru Paksha 2024 : महिला पिंडदान करू शकतात? वाचा काय सांगते गरुड पुराण

| Published : Sep 20 2024, 09:52 AM IST

Pitru Paksha 2024

सार

पितृपक्षाची सुरुवात झाली असून या काळात पितरांचे तर्पण, पिंडदान केले जाते. यामुळे आयुष्यातील पितृदोष कमी होण्यासह पितरांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. पण पितृपक्षात महिला पिंडदान करू शकतात का याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Pitru Paksha 2024 : पितृपक्षावेळी पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. पण पितरांचे पिंडदान महिला करू शकतात का असा प्रश्न बहुतांशवेळा उपस्थितीत केला जातो. समाजात सर्वसामान्यपणे पिंडदान, तर्पण अशा काही गोष्टी पुरुष मंडळीच करतात. खासकरुन घरातील मोठा मुलगा अथवा पुरुष व्यक्ती करू शकतो. मात्र घरात कोणीही पुरुष नसल्यास पितरांचे श्राद्ध कोण करणार असा प्रश्न देखील उपस्थितीत होतो.

17 सप्टेंबरपासून श्राद्ध सुरु
यंदाच्या वर्षात 17 सप्टेंबरापासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध किंवा तर्पण केले जाते. पितरांच्या तिथीनुसार तर्पण आणि श्राद्ध घातले जाते.

गरुड पुराणात काय म्हटलेय?
गरुड पुराणानुसार, एखाद्या परिवारात पुरुष किंवा पुत्र नसल्यास मुलगी देखील सच्च्या मनाने पितरांचे श्राद्ध करू शकते. पितरांकडून मुलीला देखील आशीर्वाद दिले जातात. याशिवाय पुरुषांच्या अनुपस्थितीत परिवारातील महिला देखील श्राद्ध आणि पिंडदान करू शकतात.

माता सीतेने केले होते दशरथ राजाचे पिंडदान
पौराणिक कथेनुसार, माता सीतेने आपले सासरे दशरथ राजाचे पिंडदान केले होते. गया येथील फल्गू तटावरील सीता कुंडजवळ दशरथ राजाचे पिंडदान केले होते. या अनुष्ठानावेळी फाल्गु नदी, केतकीची फूल, गाय आणि वटवृक्षाला साक्षी मानत वाळूच्या मदतीने पिंड तयार करुन पिंडदान केले होते.

पितृपक्षातील श्राद्ध तिथी

  • 17 सप्टेंबर 2024 (पौर्णिमा श्राद्ध )
  • 18 सप्टेंबर 2024 (प्रतिपदा श्राद्ध )
  • 19 सप्टेंबर 2024 (द्वितीया श्राद्ध)
  • 20 सप्टेंबर 2024 (तृतीया श्राद्ध )
  • 21 सप्टेंबर 2024 (चतुर्थी श्राद्ध)
  • 21 सप्टेंबर 2024 (महाभरणी)
  • 22 सप्टेंबर 2024 (पंचमी श्राद्ध)
  • 23 सप्टेंबर 2024 (षष्ठी श्राद्ध)
  • 23 सप्टेंबर 2024 (सप्तमी श्राद्ध)
  • 24 सप्टेंबर 2024 (अष्टमी श्राद्ध)
  • 25 सप्टेंबर 2024 (नवमी श्राद्ध)
  • 26 सप्टेंबर 2024 (दशमी श्राद्ध)
  • 27 सप्टेंबर 2024 (एकादशी का श्राद्ध)
  • 29 सप्टेंबर 2024 (द्वादशी श्राद्ध )
  • 29 सप्टेंबर 2024 (मघा श्राद्ध)
  • 30 सितंबर 2024 (त्रयोदशी श्राद्ध )
  • 1 ऑक्टोंबर 2024 (चतुर्दशी श्राद्ध )
  • 2 ऑक्टोंबर 2024 (सर्वपित्री अमावस्या)

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Pitru Paksha वेळी चुकूनही करू नका या 5 चूका, भोगाल गंभीर परिणाम

तुळशीचा दिवा कधी लावू नये?