पश्मीना शॉल धुवावी का? नवीकोरी दिसण्यासाठी वाचा खास टीप्स

| Published : Nov 19 2024, 11:33 AM IST / Updated: Nov 19 2024, 11:48 AM IST

pashmina shawl cleaning tips

सार

पश्मीना शॉलचे फॅब्रिक अत्यंत नाजुक असल्याने त्याची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशातच थंडीच्या दिवसात पश्मीना शॉल वापरल्यानंतर धुवावी का असा प्रश्न अनेकांना पडतो याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत.

Pashmina shawl cleaning tips : पश्मीना शॉल आपल्या नाजुक कलाकुसर आणि मऊसर फॅब्रिकच्या कारणास्तव जगभरात प्रसिद्ध आहे. ही शॉल थंडीत शरीर उबदार ठेवण्यासह प्रत्येक प्रकारच्या आउटफिट्सला चार चाँद लावते. पण पश्मीना शॉल अत्यंत महाग आणि नाजुक असल्याने त्याची खास काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. काहीवेळेस पश्मीना शॉल न वापरल्यास त्याचे टेक्चर बिघडले जाते. अशातच पश्मीना शॉल धुवावी की नाही असा प्रश्न पडला असेल तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

स्टोर करण्याची पद्धत
पश्मीना शॉलची काळजी घेण्यासाठी काही सोपे पर्याय आहेत. जेणेकरुन पश्मीना शॉल दीर्घकाळ नवीकोरी टिकून राहण्यास मदत होईल. पश्मीना शॉल उलट बाजूने घडी करून ठेवा. यानंतर मलमलच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा.

प्लास्टिकमध्ये ठेवू नका
पश्मीना शॉल प्लास्टिकच्या बॅगेत ठेवू नका. यासाठी नैसर्गिक वस्तू जसे की, मलमलचा कापड वापरू शकता.

हवेत थोडावेळ ठेवा
पश्मीना शॉल घरी धुवू नका. यामुळे शॉलचे टेक्चर आणि फॅब्रिक खराब होऊ शकते. याशिवाय शॉलला दररोज थोडावेळ हवेत ठेवा. जेणेकरुन शॉलमधील दुर्गंध निघून जाण्यास मदत होईल.

शॉल धुण्याची योग्य पद्धत
शॉलवर एखादा डाग असल्यास तो हटवण्यासाठी शॉल थंड पाण्यात ठेवून हाताने धुवा. यासाठी माइल्ड डिटर्जेंटचा वापर करू शकता. शॉल धुतल्यानंतर त्यामधील संपूर्ण पाणी निघून जाण्यासाठी एका सुक्या टॉवेलवर पसरवून ठेवा. पश्मीना शॉल कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका.

आणखी वाचा : 

आर्टिफिशियल ज्वेलरी काळी पडलीय? या 2 वस्तूंनी करा स्वच्छ

थंडीत संत्र्याचे सेवन करावे की नाही? वाचा काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट्स