सार
सध्या सोन्याएवजी आर्टिफिशियल ज्वेलरीचा ट्रेन्ड अधिक दिसून येतो. अशातच आर्टिफिशियल ज्वेलरी कालांतराने काळी पडली जाते. ही ज्वेलरी कशी स्वच्छ करावी असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. जाणून घेऊया आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी काही खास उपाय...
Artificial Jewellery Cleaning Hacks : आर्टिफिशियल ज्वेलरी परिधान करणे प्रत्येक महिलेला पसंत असते. यामुळे क्लासी लूक येतो. मात्र, कालांतराने आर्टिफिशियल ज्वेलरी काळवंडली जाते. अशातच काळी पडलेली आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ कशी करायची असा प्रश्न पडला जातो. खरंतर, आर्टिफिशियल ज्वेलरी घरच्याघरी देखील स्वच्छ केली जाऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
टुथपेस्टचा वापर करा
- आर्टिफिशियल ज्वेलरी चमकवण्यासाठी टुथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम ज्वेलरीवर पाणी शिंपडा.
- ज्वेलरीवर टुथपेस्ट लावू त्यावर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस घाला.
- टुथब्रशच्या मदतीने आर्टिफिशियल ज्वेलरी हळूहळू स्वच्छ करा. 10 मिनिटे ज्वेलरीवर पेस्ट तशीच ठेवून द्या.
- अखेर गरम पाण्याच्या मदतीने ज्वेलरी स्वच्छ करा आणि कापडाने पुसून घ्या.
- या सोप्या हॅक्सने आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ होईल.
व्हिनेगरचा वापर
- व्हिनेगरचा वापर काही प्रकारचे डाग दूर करण्यासाठी केला जातो. याच्या मदतीने आर्टिफिशियल ज्वेलरीही स्वच्छ केली जाऊ शकते.
- सर्वप्रथम व्हिनेगर आणि पाण्याचा घोल तयार करून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
- या घोलमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी 10-15 मिनिटे बुडवून ठेवा.
- 10 मिनिटांनंतर टुथब्रशच्या मदतीने आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करा. यावर आता बेकिंग पावडर आणि लिंबाचा रसचे काही थेंब टाका.
- टिश्यू पेपरच्या मदतीने ज्वेलरी स्वच्छ करुन कापडाने पुसून घ्या.
टुथपेस्ट आणि व्हिनेगरचे लिक्वीड
- आर्टिफिशियल ज्वेलरी चमकवण्यासाठी टुथपेस्ट आणि व्हिनेगर एकत्रित करून लिक्वीड तयार करा.
- 5 मिनिटे ज्वेलरीवर लिक्वीड स्प्रे करून ठेवल्यानंतर गरम पाण्याने धुवा. यामुळे काळी पडलेली आर्टिफिशियल ज्वेलरी पुन्हा नव्याने चमकली जाईल.
आणखी वाचा :
चेहऱ्यावर हळदीचा फेस पॅक लावताना करू नका या 4 चुका, त्वचा होईल डल
थंडीत संत्र्याचे सेवन करावे की नाही? वाचा काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट्स