Lifestyle

Food

सांबार आणि रसममध्ये हा आहे फरक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Image credits: Our own

रसम आणि सांबार मधील फरक

सांबार हा घट्ट असतो तर रसम पातळ असतो. सांबारमध्ये वाटलेल्या डाळीसह काही भाज्या मिक्स केल्या जातात. पण रसममध्ये केवळ शेवग्याच्या शेंग्या असतात.

Image credits: social media

रसमचे आरोग्यदायी फायदे

रसम हे फूड पचनास हलके असून यामुळे तुमच्या शरीरातील पचनशक्ती मजबूत होते. या रेसिपीमध्ये भरपूर प्रमाणात काळी मिरीचा वापर केला जातो. रमस तुम्ही भात, इडली आणि डोसासोबत खाऊ शकता.

Image credits: social media

पोषण तत्त्वे

रसमसमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, बी3, सी, झिंक, कॉपर, मॅग्नेशिअम, सेलेनिअम, लोह आणि कॅल्शिअम सारखी पोषण तत्त्वे असतात. या पोषण तत्त्वांमुळे आरोग्याला मोठा फायदा होतो.

Image credits: social media

अ‍ॅसिडीटीची समस्या

तुम्हाला गॅसची समस्या होत असल्यास रसम तुमच्यासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. यामध्ये हळद, जीरेही मिक्स केले जाते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Image credits: social media

सांबारचे आरोग्यदायी फायदे

सांबारमध्ये भोपळा वापरला जात असल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. सांबार असे एक फूड आहे जे लहान मुल ते जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credits: social media

शेवग्याच्या शेंगा

काहीजण सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगा मिक्स करतात. याशिवाय शेवग्याच्या शेंगाच्या झाडाची पान आणि बियाही सांबारमध्ये मिक्स करू शकता. शेंगांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी गुणधर्म असतात.

Image credits: social media

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सांबारमध्ये प्रोटीन, फायबर, झिंक, फॉलिक अ‍ॅसिड, लोह आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाऊ शकते.

Image credits: social media

तज्ज्ञांचा सल्ला

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media