Paithani Saree : पैठणी साडीचे किती प्रकार आहेत? वाचा प्रत्येकाची खासियत
महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारी पैठणी साडी म्हणजे सौंदर्य, समृद्धी आणि साजशृंगाराचं प्रतीक. ही साडी मुख्यतः औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण गावात तयार होते. अत्यंत बारीक रेशमी धाग्यांनी व झकास झरीच्या कामाने ही साडी तयार केली जाते.

नारायणपेठ शैलीतील पैठणी
नारायणपेठ शैलीतील पैठणी या साड्या काहीसे वेगळ्या प्रकारात मोडतात. नारायणपेठ किंवा विशेष धार्मिक संकल्पनांवर आधारित पैठण्या ह्या सीमित प्रमाणात बनवल्या जातात आणि त्यांच्या बॉर्डर व पल्लूवर खास धार्मिक प्रतीकं असतात.
आंबा बुटी पैठणी
आंबा बुटी पैठणी या साडीवर आंबा (कैरी) आकाराचे छोटे-छोटे बुटे असतात. हे बुटे साडीवर विणलेले असतात. याला कैरी बुटी असंही म्हणतात. साधेपणात सौंदर्य असलेली ही साडी खूप लोकप्रिय आहे.
लोटस (कमळ) पैठणी
लोटस (कमळ) पैठणी या प्रकारात साडीवर कमळाचे डिझाईन असते. काही साड्यांमध्ये तलावातील हंस, कमळ, आणि कमळाची पाने यांचा सुरेख मिलाफ असतो. अशा साड्या प्राचीन मंदिरशैली आणि निसर्ग यांची आठवण करून देतात.
बांगडी मोर पैठणी
बांगडी मोर पैठणी या पैठणीमध्ये ‘मोर’ हा प्रमुख डिझाईन असतो, जो बांगडीच्या आकारात विणलेला असतो. ही साडी खूपच आकर्षक आणि महागडी मानली जाते. कलात्मक डिझाईन आणि रंगसंगतीमुळे ही साडी प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलांच्या वॉर्डरोबमध्ये असावी.
नारळी-पार पैठणी
नारळी-पार पैठणी या प्रकारात साडीवर नारळाच्या आकाराचे किंवा चक्रसदृश डिझाइन असते. याला नारळी पार म्हणतात. पारंपरिक आणि राजेशाही लूक देणारी ही साडी लग्नसोहळ्यांमध्ये नेसली जाते.

