Long Mangalsutra Designs : श्रावण महिना सुरू होणार असून यावेळी बहुतांश महिला पारंपारिक लूक करतात. अशातच साडीवर काही ट्रेन्डी लॉन्ग मंगळसूत्र ट्राय करू शकता. पाहूया याचेच काही डिझाइन..
मुंबई : मंगळसूत्र प्रत्येक विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आजकाल शॉर्ट आणि चेनसारख्या डिझाईन्ससोबतच लॉन्ग मंगळसूत्र डिझाईन्सचाही ट्रेंड आहे. अशातच 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात साडीवर लांब असे मंगळसूत्र ट्राय करायचे असेल तर त्याचे काही डिझाइन ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये पाहू शकता. अशाप्रकारचे मंगळसूत्र साडीवर पारंपारिक आणि स्टायलिशही दिसेल.
१. ट्रेडिशनल लॉन्ग मंगळसूत्र विथ राउंड पेंडेंट
तुम्हाला क्लासिक आणि पारंपारिक डिझाईन्स आवडत असतील, तर राउंड पेंडेंट असलेले लॉन्ग मंगळसूत्र नक्कीच आवडेल. यामध्ये काळ्या मण्यांची लांब चेन असते, ज्याच्या टोकाला गोल्डन किंवा कुंदन स्टाईलचा मोठा गोल पेंडेंट जोडलेला असतो. ही डिझाईन प्रत्येक साडी आणि पारंपारिक सूटसोबत रॉयल लुक देते. सण, लग्न किंवा समारंभात हे मंगळसूत्र सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

२. टेम्पल डिझाईन लॉन्ग गोल्ड मंगळसूत्र
टेम्पल डिझाईन लॉन्ग मंगळसूत्र दक्षिण भारतीय टच देते. यामध्ये लक्ष्मी माता, गणपती किंवा कोणताही पारंपारिक मंदिर ज्वेलरी पॅटर्नचा पेंडेंट जोडलेला असतो. चेनमध्ये लहान गोल्ड बीड्स असतात, ज्यामुळे मंगळसूत्राचे वजन कमी असूनही ते जड दिसते. श्रावणातील पूजा-पाठ, सण-समारंभ किंवा लग्नसारख्या खास प्रसंगी अशा प्रकारचे मंगळसूत्र साडीवर ट्राय करू शकता.
३. लॉन्ग लेयर्ड गोल्ड मंगळसूत्र डिझाईन
जर तुम्हाला मॉडर्न आणि वेगळे दागिने घालायला आवडत असतील तर लॉन्ग लेयर्ड मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता. यामध्ये डबल किंवा ट्रिपल लेयर चेन असते, ज्यामध्ये प्रत्येक लेयरवर वेगवेगळ्या स्टाईलचा पेंडेंट किंवा गोल्ड बीड्स असतात. हे दिसायला खूप जड दिसते पण घालायला हलके असते. या डिझाईनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमची पत्नी ते पार्टी, समारंभ किंवा कोणत्याही खास सणावेळी घालू शकता.



