डोकेदुखीच्या समस्येवर Painkiller च्या गोळ्या घेता? आरोग्यावर होतील दुष्परिणाम

| Published : Sep 25 2024, 10:22 AM IST / Updated: Sep 25 2024, 10:31 AM IST

headaches

सार

काहीवेळस काहीजण डोकेदुखीच्या समस्येवर लगेच पेन किलरच्या गोळ्या घेतात. मात्र पेनकिलरमुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत.

Painkiller during Headache : डोकेदुखीच्या कारणास्तव खुप चिडचिड होऊ लागते. अशा स्थितीत लगेच बरे वाटण्यासाठी बहुतांशजण पेनकिलरच्या गोळ्या घेतात. पण तुम्हाला माहितेय का, पेन किलरच्या गोळ्यांमुळे आरोग्याचे फार मोठे नुकसान होऊ शकते. पेन किलरच्या गोळ्यांमुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

डोकेदुखीवेळी पेन किलर खाणे टाळा
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, डोकेदुखीच्या समस्येवेळी लगेच पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करू नका. कारण यामुळे आरोग्याचे काही प्रकारे नुकसान होऊ शकते. पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्याने पोटासंबंधित समस्या उद्भवू शकता. याशिवाय दुखणे वाढणे, सूज येणे आणि अन्य काही समस्याही उद्भवू शकतात. एवढेच नव्हे पोटात अल्सरही वाढण्याचा धोका निर्माण होतो. पेनकिलरच्या गोळ्यांमुळे यकृतासह किडनीवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

डोकेदुखीच्या समस्येवर पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो. पण दीर्घकाळासाठी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकता. यामुळे कधीच डोकेदुखीवर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध किंवा गोळ्या घेणे टाळावे.

डोकेदुखीवर औषधं का घेऊ नये?
डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी लगेच पेनकिलर खाऊ नये. ओव्हर द काउंटर औषधांचे सेवन एका मर्यादित प्रमाणात करणे सुरक्षित असते. पण अत्याधिक प्रमाणात पेनकिलर अथवा अन्य औषधे घेतल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक वाढली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याची सवयही कधीकधी आरोग्यासाठी घातक ठरते. शरिरावर याचे वाईट परिणाम दिसून येतात.

डोकेदुखीवर लगेच गोळ्या घेतल्याने होणारे नुकसान

  • औषधांचे अत्याधिक प्रमाणा सेवन केल्याने पोटातील नर्वस सिस्टम आणि शरिरातील रोगप्रतिकार शक्तीवर वाईट परिणाम होतो.
  • पेनकिलरच्या गोळ्यांमुळे पोटासंबंधित समस्या जसे की, दुखणे वाढणे, सूज येणे किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.
  • डोकेदुखीवेळी अत्याधिक प्रमाणात पेनकिलरच्या सेवनाने यकृत आणि किडनीवर त्याचा गंभीर परिणाम होतो.
  • शरिराची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.
  • हृदयासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटकाही येण्याचा धोका वाढतो.
  • डोकेदुखीवर पेन किलरच्या गोळ्या घेतल्यास पोटात अल्सरची समस्या होऊ शकते.

(DISCLAIMER: लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

या 4 व्यक्तींनी चुकूनही खाऊ नये भेंडी, उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

बदलत्या वातावरणामुळे अनाचक वाढलेत हे 3 आजार, वेळीच घ्या आरोग्याची काळजी