- Home
- lifestyle
- मुंबई पुण्यातील ओपन मॅरेज म्हणजे काय? ओपन मॅरेज आणि अनैतिक संबंध याचे फायदे-तोटे-फरक काय?
मुंबई पुण्यातील ओपन मॅरेज म्हणजे काय? ओपन मॅरेज आणि अनैतिक संबंध याचे फायदे-तोटे-फरक काय?
मुंबई - आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतात लग्न हा अजूनही एक पवित्र बंधन समजले जाते. भारतात कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे. पण आता पुण्यामुंबईची जोडपी ओपन मॅरेजची संकल्पना झपाट्याने स्वीकारत आहेत. जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे..

ओपन मॅरेजला समाजमान्यता
मुंबईत आणि पुण्यात परदेशी ट्रेंड खूप फॉलो केले जातात. ते कपड्यांचे असोत किंवा जीवनशैलीचे. आता तर ते सोडाच, मुंबईकर आणि पुणेकर त्यांच्या वैवाहिक जीवनातही अनेक नवीन परदेशी ट्रेंड फॉलो करत आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतात लग्न हे अजूनही एक पवित्र बंधन मानले जाते. पण आता पुण्यामुंबईची जोडपी या पवित्र बंधनात ओपन मॅरेजची संकल्पना झपाट्याने स्वीकारत आहेत.
मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात?
होय, ओपन मॅरेजची संकल्पना परदेशात खूप प्रसिद्ध आहे. आता हा ट्रेंड पुण्यामुंबईतही आपले पाय रोवत आहे. तर चला मानसोपचार तज्ज्ञ याबद्दल काय म्हणतात ते पाहूया...
"ओपन मॅरेज" म्हणजे?
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की काळानुसार लग्न आणि कुटुंबाची संकल्पना बदलत चालली आहे. काही विवाहित जोडपी आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहणे पसंत करतात, तर काही जण लग्नानंतरही नवीन नात्यांच्या शोधात असतात. "ओपन मॅरेज" म्हणजे असा विवाह ज्यामध्ये पती-पत्नी आपले मूळ नाते टिकवून ठेवतात, पण दोघेही इतर कोणाशीही प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास परस्पर संमती देतात. मात्र भारतीय समाजात याला कायदेशीर मान्यता नाही.
परस्पर सहमतीने दिलेली मान्यता
जर तुम्हाला वाटत असेल की ओपन मॅरेज आणि विवाहबाह्य संबंध हे सारखेच आहेत, तर ते चुकीचे आहे. या दोघांमध्ये मोठा फरक आहे. ओपन मॅरेज म्हणजे पती-पत्नींचा परस्पर सहमतीने दिलेली मान्यता, ज्यामध्ये दोघेही लग्नानंतर इतर व्यक्तीशी प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी देतात.
लपून-छपून ठेवलेला संबंध
पण विवाहबाह्य संबंध म्हणजे साधारणपणे दुसऱ्या व्यक्तीशी लपून-छपून ठेवलेला संबंध असतो आणि पहिला जोडीदार त्याला कधीच मान्यता देत नाही. थोडक्यात सांगायचे तर, ओपन मॅरेजमध्ये जोडीदाराला सगळं माहित असतं, पण विवाहबाह्य संबंधात सगळं जोडीदारापासून लपवलेलं असतं.
ओपन मॅरेजचा ट्रेंड वाढताना का दिसतो?
होय, कालांतराने पुण्यामुंबईत ओपन मॅरेजचा ट्रेंड वाढताना दिसत आहे आणि विवाहित जोडप्यांमध्ये तो लोकप्रिय होत आहे. भारतीय समाज परंपरेने एकपत्नीत्व आणि पारंपरिक विवाहाला महत्त्व देतो, पण बदलत्या विचारसरणी आणि जागतिक ट्रेंडच्या प्रभावामुळे काही लोक ओपन मॅरेज स्वीकारत आहेत.
