Marathi

गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक घरच्या घरी कसे बनवावे?

Marathi

साहित्य

तांदळाचे पीठ – १ कप, गुळ – १ कप, खोबरे (ओले) – १ कप, तूप – २ चमचे, वेलची पूड – १ चमचा, पाणी – १ कप, चिमूटभर मीठ

Image credits: social media
Marathi

सारण तयार करणे

कढईत गुळ आणि खोबरे घालून मंद आचेवर परता. गुळ पूर्णपणे वितळला की वेलची पूड घाला. सारण कोरडेसर होईपर्यंत परता आणि गार होऊ द्या.

Image credits: social media
Marathi

उकड बनवणे

पाणी, मीठ आणि थोडं तूप उकळायला ठेवा. उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवून २ मिनिटे शिजू द्या. थोडं गार झाल्यावर हाताने किंवा चमच्याने मळून मऊ उकड तयार करा.

Image credits: social media
Marathi

मोदकला आकार देणे

उकडीचा गोळा घेऊन हाताने किंवा मोदकाच्या साच्याने पातळ कड्या काढा. त्यात तयार केलेलं सारण भरा. वरती नीट बंद करून मोदकाचा आकार द्या.

Image credits: social media
Marathi

वाफवून तयार करणे

मोदकांना वाफवायच्या पात्रात ठेवा. १०-१२ मिनिटे वाफवल्यावर उकडीचे मोदक तयार होतील. गरमागरम मोदकांवर तूप टाकून गणपती बाप्पांना नैवेद्य द्या आणि स्वतःही आनंद घ्या.

Image credits: social media
Marathi

किचन शेफ टिप्स

उकडीचे मोदक तयार करणे हे एक कौशल्याचे काम आहे. अनेकदा हे मोदक शिजवताना फुटतात. त्यामुळे जास्त सारण भरु नका. उकडताना जास्तही उकडू नका. त्यामुळे तुमचे मोदक खुसखुशीत होतील.

Image credits: facebook

बायकोला गिफ्ट करा हे Gold Stud Earrings, होईल खुश

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास कोट्स

सणासुदीला नेसा बांधणी प्रिंट साड्या, खुलेल सौभाग्यवतीचा लूक

Independence Day निमित्त नखांना द्या हटके लूक, करा असे Nail Arts