Online Payment : चुकीच्या क्रमांकावर UPIने ऑनलाइन पेमेंट केलंय? रिफंडसाठी या टिप्स करा फॉलो

| Published : Dec 11 2023, 11:56 AM IST / Updated: Dec 11 2023, 11:58 AM IST

UPI
Online Payment : चुकीच्या क्रमांकावर UPIने ऑनलाइन पेमेंट केलंय? रिफंडसाठी या टिप्स करा फॉलो
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

UPI Payment : एखाद्याला युपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करताना चुकीच्या क्रमांकावर पैसे पाठवले गेलेत का? यावेळी नक्की काय करावे हे बहुतांशजणांना कळत नाही. खरंतर चुकीच्या क्रमांकावर गेलेल्या पेमेंटचा रिफंड तुम्हाला मिळू शकतो.

Wrong Digital Payment:  काहीवेळेस युपीआयच्या (UPI) माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करताना अथवा पैसे ट्रांसफर करताना तुम्ही कधी चुकीचे बँक खाते टाइप केले आहे का? याच कारणास्तव तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रांसफर झाले असतील. पण ते पैसे पुन्हा कसे मिळवावे हे कळत नसल्यास ही बातमी नक्की वाचा.

चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रांसफर झाल्यास सर्वप्रथम काय करावे हे पाहूया. त्याचसोबत युपीआय आणि नेट बँकिंगदरम्यान (Net Banking) चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावे, जेणेकरून 48 तासात पैसे तुम्हाला परत मिळतील.  

या गोष्टींची घ्या काळजी
युपीआय किंवा नेट बँकिंग केल्यानंतर खात्यातून पैसे कापले गेल्याचा मेसेज मोबाइलवर येतो. यावेळी पैसे खात्यातून कापले गेल्याचा मेसेज डिलिट करू नका. या मेसेजमध्ये एक पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) क्रमांक असतो. पैशांच्या रिफंडसाठी या मेसेजची गरज भासते.(Money Refund After Wrong UPI Payment)

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये हे स्पष्ट केले आहे की, तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रांसफर केल्यास bankingombeudsman.rbi.org.in वर तक्रार करावी. यासोबत एक अर्जदेखील बँकेत द्यावा लागेल. या अर्जामध्ये तुम्हाला बँक खाते क्रमांक, नाव आणि ज्या खात्यात पैसे ट्रांसफर झाले आहे त्याची संपूर्ण माहिती द्यावी.

हेल्पलाइन क्रमांकावर करू शकता फोन
चुकीच्या खात्यात पैसे गेल्यानंतर हेल्पलाइन क्रमांकावरही फोन करू शकता. यासाठी सर्वप्रथम 18001201740 या हेल्पलाइन क्रमांकांवर फोन करू शकता. तसेच बँकेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता.

अन्य पर्याय
चुकीच्या बँक खात्यात पैसे गेल्यास समोरच्या व्यक्तीला कॉल अथवा ईमेलच्या माध्यमातून संपर्क करू शकता. समोरचा व्यक्ती पैसे देण्यास तयार झाल्यास ते पैसे तुम्हाला सात दिवसाच्या आत बँक खात्यात पुन्हा मिळू शकतात.

काहींना हा देखील प्रश्न पडतो, ज्या व्यक्तीला पैसे गेले आहेत आणि त्याने ते देण्यास नकार दिल्यास काय करावे? याप्रकरणी ज्या व्यक्तीला पैसे गेले आहेत त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करू शकता.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा:

Google Payच्या मदतीने करताय मोबाइल रीचार्ज? आकारली जाऊ शकते इतकी Convince Fees

Technology Tips: जुना स्मार्टफोन विकताय? ‘या’ गोष्टी करण्यास विसरू नका, अन्यथा...

Aadhaar Card: PVC आधार कार्ड काढायंच? जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची प्रक्रिया