Nowruz 2024 :आज संपूर्ण भारतात साजरा केला जाणार नवरोज सण

| Published : Mar 20 2024, 07:20 AM IST / Updated: Mar 20 2024, 11:06 AM IST

navruz celebration 2024

सार

पारशी मान्यतेनुसार नवरोज हा निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस आहे. हा उत्सव वर्षातून दोनदा साजरा केला जातो.

Parsi New Year : 'नवरोज' हा पारशी समाजाचा प्रमुख सण आहे. या दिवसापासून पारशी समाजाच्या नववर्षाची सुरुवात केली जाते. या नववर्षाचे वैशिष्ठ्य म्हणजे या दिवशी रात्र आणि दिवसाचा कालावधी जवळपास असतो. पारशी समाजाच्या मान्यतेनुसार नवरोज हा निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस आहे. हा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो.त्यामुळे निसर्गाचे आभार मानण्यासाठी हा सण आज साजरा केला जाणार आहे.

नवरोज सणाचा इतिहास काय आहे ?

समाजाच्या मान्यतेनुसार नवरोज हा सण राजा जमशेदच्या आठवणीत साजरा केला जातो. 3 हजार वर्षांपूर्वी इराणमध्ये शाह जमशेद नावाच्या व्यक्तीने सिहांसनावर बसत संपूर्ण अधिकार आपल्या हाती घेतले होते. त्यामुळे त्या दिवसाला नवरोज असे मानले जाते.त्यानंतर याचे रूपांतर नववर्षात झाले. जगातील प्रमुख देशांमध्ये नवरोज साजरा केला जातो.

नवरोज कधी साजरा केला जातो ?

पारशी नववर्ष जगभरात वर्षातून दोनदा साजरे केले जाते. त्याच वेळी, भारतात नवरोज शाहनशाही कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. अशा परिस्थितीत पारशी समाजाचा पहिला नवरोज 20 मार्च रोजी साजरा होणार आहे. तर दुसरा नवरोज 16 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

नवरोजचा अर्थ काय?

'नवरोज' हा शब्द 'नव' आणि 'रोझ' या दोन शब्दांपासून बलेला आहे, ज्यामध्ये 'नव' म्हणजे 'नवीन' आणि 'रोज' म्हणजे 'दिवस'. म्हणजेच नवीन दिवस.त्यामुळे या शब्दानुसार नवीन वर्षाला हा समाज मोठ्या उत्साहाने स्वागत करतो.

आणखी वाचा :

भारतातील या प्रांतात कशी साजरी करतात होळी? त्यामागील कथा काय सांगतात जाणून घ्या

Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?

Holashtak 2024 : यंदा होलाष्टक कधी? या काळात शुभ कार्य करणे असते वर्ज्य