सार

काही वेळेस टॅनिंग आणि धूळ-माती जमा होऊन मान काळंवडली जाते. अशातच वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण तरीही काही फरक जाणवत नसल्यास घरच्याघरी एक सोपा उपाय करू शकता.

Neck Pigmentation Home Remedies : त्वचेचे टेक्चर ऋतू आणि वयासह बदलले जाते याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. चेहऱ्याशिवाय हातापायांची त्वचा ते कोपरे आणि मानेच्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. सध्या त्वचा काळवंडणे एक सामान्य बाब झाली आहे. यावर वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. तरीही बहुतांशवेळा फरक दिसून येत नाही. खरंतर, काळवंडवलेल्या त्वचेवर वेळीच उपाय करणे अत्यावश्यक असते. जाणून घेऊया काळवंडलेली मान उजवळण्यासाठी पुढील सोपा घरगुती उपाय सविस्तर...

काळवंडलेल्या त्वचेसाठी उपाय

काळवंडलेल्या त्वचेसाठी बटाटा आणि मधाचा वापर करू शकता. या दोन्ही वस्तूंचा त्वचेवर कसा परिणाम होतो पाहू.

मध त्वचेवर लावण्याचे फायदे

  • त्वचा नैसर्गिक पद्धतीने एक्सफोलिएट करण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर असते.
  • मधामुळे चेहऱ्यावरील पोर्स स्वच्छ होण्यास मदत होते.
  • चेहऱ्याची त्वचा मऊ आणि डार्क स्पॉट दूर करण्यासाठी मधाचा वापर करू शकता.

बटाटा त्वचेवर लावण्याचे फायदे

  • डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरू शकतो.
  • त्वचेवर असणारे अत्याधिक तेल कमी करण्यासाठी बटाटा वापरला जातो.
  • त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या आणि टॅनिंगची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

काळवंडलेल्या मानेची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

  • सर्वप्रथम एक बटाटा मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • बटाट्याच्या पेस्टमध्ये दोन ते तीन चमचे मध टाका.
  • बटाट्याची पेस्ट मानेवर लावून ठेवा.
  • 20 मिनिटांनंतर मानेवरील बटाट्याची पेस्ट एका कॉटन कापने स्वच्छ करुन पाण्याने धुवा.
  • बटाट्याच्या पेस्टचा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यानंतर काळवंडलेल्या मानेची समस्या कमी झाल्याचे दिसून येईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Health Tips : अडीच हजार स्टेप्स चालूनही रहाल फिट, वाचा कसे

दररोज फळ-भाज्या खा आणि पोटावरील चरबीला करा गुडबाय