MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • दररोज फळ-भाज्या खा आणि पोटावरील चरबीला करा गुडबाय

दररोज फळ-भाज्या खा आणि पोटावरील चरबीला करा गुडबाय

Belly Fat Loss Tips : बहुतांश महिलांचे हात आणि पाय सडपातळ असतात. पण पोटाच्या आजूबाजूची चरबी अधिक वाढलेली दिसते. अशातच वजन कमी करण्यासह पोटावरील चरबी कमी कशी करायची असा प्रश्न पडलाय का? यावर सोपा उपाय म्हणजे दररोज फळ आणि भाज्यांचे सेवन करा.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Sep 05 2024, 08:48 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पोटावरील चरबी कमी करतील हे फूड्स
Image Credit : Getty

पोटावरील चरबी कमी करतील हे फूड्स

आजकाल मार्केटमध्ये काही अशी औषधे, सप्लिमेंट्स अथवा ड्रिंक्स मिळतात ज्याच्या माध्यमातून वेगाने पोटावरील चरबी कमी होईल असा दावा केला जातो. मात्र वर्ल्ड हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, वैज्ञानिक दृष्टीने वेगाने चरबी कमी करणारे प्रोडक्ट्स आरोग्यासाठी पुर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी नसतात. अशातच पोटावरील चरबी कमी करण्यासह वजनही कमी होण्यासाठी योग्य डाएट प्लॅनची आवश्यकता असते. याशिवाय दररोजच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करणेही महत्वाचे आहे. जाणून घेऊया पोटावरील चरबी कमी करण्यासाठी भाज्या आणि फळ कशाप्रकारे मदत करतात याबद्दल सविस्तर…

26
एवोकाडो
Image Credit : others

एवोकाडो

अतिरिक्त कॅलरीच्या कारणास्तव बहुतांशजण एवोकाडो खाणे टाळतात. एवोकाडोच्या मदतीने पोटावरील चरबी कमी होऊ शकते. यामध्ये असलेले वसा, फायबर, व्हिटॅमिन ई, मोनो सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि ल्यूटिन भरपूर प्रमाणात असते. आरोग्य तज्ज्ञांनुसार, वजन कमी करताना दररोज एक एवोकाडोचे सेवन केल्याने वेगाने पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

36
ओटमील
Image Credit : i stock

ओटमील

वजन कमी करताना ओटमीटलचा डाएटमध्ये समावेश करावा. यामुळे दिवसभर पोट भरलेले राहते आणि यामधून महत्वाचे फायबर, प्रोटीनही मिळतात. ओट्समध्ये असणारे सॉल्युबल फायबर आणि गुड बॅक्टेरिया वजन कमी करण्यासह शरिराला उर्जा देणे, एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात.

46
अंड्याचा सफेद भाग
Image Credit : our own

अंड्याचा सफेद भाग

अंड्यामध्ये कमी कॅलरी असण्यासह डायटरी न्युट्रिएंट्स, हेल्दी वसा, व्हिटॅमिन डी सारखे काही पोषण तत्त्वे असतात. अंड्याचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यासह वजन कमी होण्यास मदत होते. यावेळी केवळ अंड्याच्या सफेद भागाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो. डाएटमध्ये अंड्याचे वेगवेगळे प्रकार खाऊ शकता.

56
हिरव्या पालेभाज्या
Image Credit : stockPhoto

हिरव्या पालेभाज्या

हेल्दी आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे अत्यंत महत्वाचे असते. पालकसारख्या भाज्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. खरंतर, हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

66
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर
Image Credit : Image: Freepik

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर

वजन कमी करण्यासाठी बहुतांशजण अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन करतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वेगाने वाढते आणि चरबी कमी होण्यास मदत होते. पण अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करुन प्यावे असा सल्ला दिल जातो. अन्यथा घसा, दातांसंदर्भात समस्या उद्भवू शकतात. यामुळे वजन कमी करताना अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा विचारपूर्वक वापर करावा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

बटाट्याच्या रसापासून घरीच तयार करा टोनर, कमी होतील डार्क सर्कल

केसांवर हेयर मास्क लावण्याआधी या 5 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा वाढेल समस्या

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved