नवरात्रीची सहावी माळ : देवी कात्यायनी दूर करेल भय; जाणून घ्या पूजा-विधी

| Published : Oct 08 2024, 08:43 AM IST

Devi Katyayani Puja

सार

Navratri 6th Day 2024 : देशभरात शारदीय नवरात्रौत्सव साजरी केली जात आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. ऋषी कात्यायन यांची पुत्री असल्याने देवीला ते नाव दिले गेले. देवी कात्यायनीच्या पूजेने आयुष्यात सर्व सुख मिळते.

Navratri 2024 Devi Katyayani : शारदीय नवरात्रीच्या सहाव्या माळेला देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनी ऋषी कात्यायन यांची पुत्री आहे. यामुळेच तिचे नाव देवी कात्यायनी असे आहे. या देवीला चार भुजा असून तिचे वाहन सिंह आहे. याशिवाय देवीचे स्वरुप अतिशय सौम्य आहे. देवी कात्यायनीच्या पूजेने आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतात. एवढेच नव्हे पूजा केल्याने रोग, शोक आणि भय दूर होते. जाणून घेऊया देवी कात्यायनीची पूजा-विधी, शुभ मुहूर्त

8 ऑक्टोबर 2024 शुभ मुहूर्त

  • सकाळी 09:19 ते 10:46
  • सकाळी 10:46 ते दुपारी 12:14 पर्यंत
  • दुपारी 12:14 ते 01:41 पर्यंत
  • सकाळी 03:08 ते 04:36

देवी कात्यायनीची पूजा-विधी

  • सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा.
  • देवी कात्यायनीचा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवा.
  • देवी समोर तूपाचा दिवा लावून हळद-कुंकू आणि फूल अर्पण करा.
  • देवी कात्यायनीला लाल चुनरी, कुंकू, लाल फूल, लाल रंगाच्या बांगड्या अशा वस्तूही अर्पण करा.
  • देवीला मधाचा नैवेद्य दाखवा. पुढील मंत्राचा जप करा

चन्द्रहासोज्जवलकरा शार्दूलावरवाहना। कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवद्यातिनी।।

आयुष्यातील या इच्छा पूर्ण करेल देवी
लग्न होत नसल्यास देवी कात्यायनीची पूजा करावी असे सांगितले जाते. मनासारखा जोडीदार, लव्ह मॅरेजसाठीही देवीची प्रार्थना केली जाते. वैवाहिक आयुष्य आनंदीत राहावे, कुंडली विवाहाचा योग कमी असल्यास देवीच्या कृपेने विवाह होतो. ज्योतिषांनुसार देवी कात्यायनीची पूजा करताना काही नियम नक्की लक्षात ठेवावेत.

देवी कात्यायनीची कथा
पौराणिक कथेनुसार, एका वनात कत नावाचे एक महर्षी होते. त्यांचा एक पुत्र होता त्याचे नाव कात्य ठेवण्यात आले होते. याच्यानंतर कात्य गोत्रात महर्षी कात्यायन यांनी जन्म घेतला. यांना एकही मुल-बाळ नव्हते. देवी भगवतीला पुत्रीच्या रुपात मिळवण्याची महर्षी कात्यायन यांची इच्छा होती. यामुळे महर्षींनी पराम्बाची कठोर तपस्या केली. महर्षी कात्यायन यांच्या तपस्येमुळे देवी प्रसन्न होत त्यांना पुत्रीचे वरदान दिले. काही काळानंतर राक्षस महिषासुराचा अत्याचार अधिक वाढला गेला. त्यावेळी त्रिवेदांच्या तेजामधून एका कन्येने जन्म घेतला आणि महिषासुराचा वध केला. कात्य गोत्रात जन्म घेतल्याने देवीचे नाव कात्यायनी पडले गेले.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Vijayadashami 2024 : दसऱ्याला शस्र पूजा का करतात? वाचा शुभ मुहूर्तासह विधी

Navaratri 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास Message पाठवून देवी दुर्गेला करा वंदन

Read more Articles on