सार
Navratri 2024 : मध्य प्रदेशातील भिण्ड शहरापासून 12 किलोमीटर दूर अंतरावर बिल्होरा गावात धुमगिरी मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या पूजेचा मान केवळ विधवा महिलांना मिळतो. याच मंदिराबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Navratri 2024 : बहुतांशजण आपल्या मनातील इच्छा-मनोकामना देवासमोर व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातात. असेच एक अनोखे मंदिर मध्य प्रदेशातील भिण्ड येथे आहे. या मंदिरात सर्व भक्त नव्हे तर केवळ विधवा महिला पूजेसाठी जातात. धुमगिरी असे मंदिराचे नाव आहे.
भिण्ड शहरापासून 12 किलोमीटर दूर अंतरवारील बिल्होरा गावत धुमगिरी मंदिर स्थित आहे. या मंदिरात शनिवारी दूरदूरवरुन भक्त येतात. मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की, जो भक्त मंदिराभोवती पाच फेऱ्या मारतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंदिरात केवळ विधवा महिला पूजा करण्यासाठी येतात. याशिवाय जो भक्त विधवा महिलेला पूजेवेळी सहभागी करुन घेतो त्याची पूजा देवी मान्य करते असे मानले जाते. भिण्ड जिल्हात हे मंदिर धुमगिरी देवी मंदिर नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराचे महंत विजय नारायण पुरोहित सांगतात की, देवी धूमगिरी 10 वर्षांपूर्वी स्वप्नात आली होती. त्यावेळी देवीने या मंदिराला बिल्होरा धाम नावाने स्थापन करण्यास सांगितले होते.
कुठे आहे मंदिर
भिण्ड जिल्ह्यातील प्राचीन धुमगिरी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी शहरापासून 10 किलोमीटर दूर बीटीआय रोडवर बिल्होरा गावापर्यंत जावे लागेल. येथून एक किलोमीटर दूर धूमगिरी मंदिरासाठी जाण्यासाठी कच्चा मार्ग आहे. मंदिरात येणारे भाविक म्हणतात की, ज्यांना नोकरी, मुलं होत नाही ते मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात.
शेकडो वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर
भिण्ड जिल्ह्यातील धूमगिरी माता मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे. या मंदिराची पुर्नस्थापना 1996 मध्ये केली होती. याआधी एका झाडाखाली लहान मंदिर होते. आज या मंदिरात शनिवारी भाविक आपल्या इच्छा घेऊन येतात.
आणखी वाचा :
Navratri 2024 : महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे, वाचा अख्यायिका
तिरुपती मंदिर : २४ तास पूजा आणि कोट्यावधी रुपयांचा वाटला जातो प्रसाद