तिरुपती वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे दरदिवशी ३ ते ५ कोटींच्या दरम्यान पैसे, सोने आणि दागिने चढवले जातात. काही खास दिवसांमध्ये हे वाढवलं जात.
तिरुपती येथे आलेला जवळपास प्रत्येक भक्त हा केस कापत असतो. येथे पूर्वीपासून केस कापण्याची परंपरा चालत आलेली आहे.
तिरुपती मंदिरात दररोज हजारोंच्या घरात भाविक येत असतात. हीच संख्या एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस लाखोंचा घरात जाते.
तिरुपती मंदिराचा इतिहास हा २,०००० वर्ष जुना आहे. या मंदिराला भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक समजले जाते.
तिरुपती येथील प्रसाद प्रसिद्ध असून त्याला जीआय टॅग देण्यात आला आहे. हा प्रसाद भाविक येथून जाताना आवर्जून घेऊन जातात.
या मंदिरात परंपरेनुसार अनेक गोष्टी केल्या जातात. येथे विविधता असल्यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असते.
या मंदिरात आल्यानंतर कुंडलिनी शक्ती विकसित होते. येथे श्रद्धाळू आणि शांती मिळवण्यासाठी भाविक भक्त येतात.
येथे २४ तास पूजा अर्चा चालू असतात. मंदिरात रोज नियमितपणे पूजा करण्यासाठी भाविक भक्त उपस्थित राहतात.