सार
2 Lucky Rashi During Navratri 2024 : शारदीय नवरात्रौत्सवाला लवकरच देशभरात सुरुवात होणार आहे. या काळात देवी दुर्गेची नऊ दिवस मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. यंदाच्या वर्षी कोणत्या राशींवर देवी दुर्गेचा आशीर्वाद राहणार याबद्दल जाणून घेऊया.
2 Lucky Rashi During Navratri 2024 : येत्या 2 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. काहीजणांना नऊ दिवस कडक उपवासही असतो. देवी दुर्गेची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकटे, कष्ट आणि दोष दूर होऊन सुख-समृद्धी येते असे मानले जाते. यंदाच्या नवरात्रौत्सवावेळी कोणत्या राशींवर देवी दुर्गेचा आशीर्वाद राहणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
3 ऑक्टोंबरला घटस्थापना
येत्या 3 ऑक्टोंबरला घटस्थापना आहे. याच दिवसापासून पुढील नऊ दिवसांसाठी नवरात्रौत्सव साजरी केली जाणार आहे. नवरात्रौत्सवात देवी दुर्गेची पूजा केली जाते. यामुळे घरावर येणारी सर्वे संकटे दूर होतात असे मानले जाते. देवीची पूजा करताना लाल रंगातील फुलं आणि ओढणी आवश्यक अर्पण करावी. अशातच दोन राशी आहेत ज्यांच्यावर देवी दुर्गेची सदैव कृपा राहते.
या दोन राशींचे चमकणार नशीब
वृषभ राशी
वृषभ राशीचा गुरु स्वामी शुक्र आहे. आराध्य देवी दुर्गा आहे. यामुळे वृषभ राशीवर नेहमीच देवी दुर्गेचा आशीर्वाद राहतो. नवरात्रौत्सावेळी वृषभ राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. जी काही संकटे येणार आहेत ती दूर होतील. अडकलेले पैसेही मिळणार आहेत. महत्वपूर्ण कार्येही पूर्ण होतील. नवरात्रीच्या वेळात देवीला लाल रंगातील फुल अर्पण करुन पूजा करा.
तुळ राशी
तुळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे. या राशीची आराध्य देवी दुर्गा आहे. नवरात्रीच्या काळात शुक्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तुळा राशींच्या व्यक्तींवर नवरात्रौत्सावेळी देवी दुर्गेची खास कृपा राहणार आहे. करियरमध्ये प्रगती, विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होणार आहे. व्यापारात गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास नवरात्रौत्सवाचा कालवधी सर्वोत्तम आहे. एखाद्या नव्या व्यवसायाची देखील सुरुवात करू शकता. नवरात्रौत्सवावेळी तुळ राशीच्या व्यक्तींनी आवश्यक देवी दुर्गेची मनोभावे पूजा करावी.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी जाताना या 8 गोष्टी ठेवा लक्षात
सिद्धिविनायक ते श्री मुंबादेवी...मुंबईतील 10 प्रसिद्ध मंदिरे