दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात मुंबादेवीचे मंदिर आहे. येथे आलेल्या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. पण मंदिरात प्रवेश करताना काही नियमांचे पालन करावे लागते.
मंदिरात देवीच्या दर्शनावेळी पारंपारिक पद्धतीचे वस्र परिधान करावेत.
मंदिरात भाविकांना सकाळी 7 वाजल्यापासून त रात्री 8.45 पर्यंत दर्शन घेता येते.
मंदिरात विशेष पूजा-प्रार्थनेतही सहभागी होऊ शकता.
मंदिरात प्रवेश करताना आणि केल्यानंतर परिसरात स्वच्छता राखावी.
मुंबादेवीच्या मंदिरात चप्पल घालून जाण्यास बंदी आहे. चप्पल भाविकांना मंदिराबाहेर काढण्यास सोय करण्यात आलेली आहे.
मंदिरात भाविकाला कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ नेण्यास बंदी आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर तेथील शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलतानाही कमी आवाजात बोलावे.
मंदिरात कोणालाही फोटो काढण्याची परवानगी नाही.