मुंबईत काही फिरण्यासह देवाचीही प्रसिद्ध मंदिरे आहेत.मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरच नव्हे तर अन्य काही मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
मुंबईतील सर्वाधिक जुन्या मंदिरांपैकी एक मुंबादेवीचे मंदिर आहे. देवीला समर्पित असणाऱ्या या मंदिराची स्थापना वर्ष 1675 रोजी झाली होती.
गणपतीला समर्पित असणारे सिद्धिविनायक मंदिर वर्ष 1801 रोजी स्थापन करण्यात आले होते. मंगळवारी मंदिरात भाविकांची खुप गर्दी होते.
देवी दुर्गा, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीला समर्पित असणारे महालक्ष्मी मंदिरही मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
भगवान शंकराना समर्पित असणारे बाबुलनाथ मंदिर चर्नी रोड येथे आहे. या मंदिरात शंकराच्या महाआरतीला भाविक मोठी गर्दी करतात.
भगवान रामाने स्थापन केलेले भगवान शंकरांचे मंदिर वाळकेश्वर येथे आहे. मंदिर मलबार हिल्स येथे आहे.
भगवान कृष्ण आणि राधेला समर्पित असणारे इस्कॉन मंदिर जुहू येथे आहे. या मंदिरात गेल्यानंतर मनं प्रसन्न आणि शांत होते.
भगवान श्रीकृष्णाला समर्पित असणारे स्वामीनारायण मंदिर भुलेश्वर येथे आहे. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
जैन धर्मियांचे धार्मिक स्थळ असणारे बाबू अमीचंद पनालाल आदिश्वरजी जैन मंदिरात संगमरवरावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे. या मंदिराची स्थापना 1970 रोजी झाली होती.
भगवान व्यंकटेश्वरला समर्पित असणाऱ्या बालाजी मंदिरातही भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य मंदिरांसारखे आहे.
देवी प्रभावतीला समर्पित असणारे प्रभादेवी मंदिर सिद्धिविनायक मंदिराजवळच आहे. या मंदिराकडून जत्रेचेही आयोजन केले जाते.