सार

Navratri 2024 : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला केल्या जाणाऱ्या देवीची पूजा-विधीसह मंत्र जपबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Devi Chandraghanta Puja Vidhi :  देवी दुर्गेचे तिसरे स्वरुप चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते. देवीचे हे स्वरुप अत्यंत सुंदर, मनमोहक, अलौकिक आणि शांतीदायक आहे. देवी कपाळावर अर्धचंद्र असल्याने तिला चंद्रघंटेच्या नावाने ओखळले जाते. असे मानले जाते की, देवीची मनोभावे पूजा केल्याने भक्ताच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया देवी चंद्रघंटेची पूजा-विधीसह मंत्र जपबद्दल सविस्तर...

देवी चंद्रघंटेची पूजा-विधी

  • नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्र परिधान करावे आणि घरात गंगाजल शिंपडावे.
  • देवी चंद्रघंटेच्या समोर तूपाचा दिवा लावा.
  • देवीला अक्षता, सिंदूर, फूल अर्पण करा.
  • देवीला नैवेद्य म्हणून फळ आणि केशर-दूधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाई दाखवा.
  • देवी चंद्रघंटेची आरती करता.
  • पूजा संपन्न झाल्यानंतर देवीकडे एखादी चूकभूल झाल्यास क्षमा मागा.

देवी चंद्रघंटेचा बीज मंत्र
ऐं श्रीं शक्तयै नम:।

देवी चंद्रघंटेचा स्तुती मंत्र
या देवी सर्वभू‍तेषु मां चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

देवी चंद्रघंटेची प्रार्थना
पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥

देवी चंद्रघंटेचे स्वरुप
हिंदू मान्यतेनुसार, देवी दुर्गेचे तिसरे स्वरुप देवी चंद्रघंटा आहे. कपाळावर अर्धचंद्रकोर असल्याने तिला चंद्रघंटा नाव पडले आहे. या देवीची पूजा केल्याने मानसिक समस्या दूर होतात. याशिवाय आयुष्यात एखाद्या गोष्टीची वाटणारी भिती देखील दूर होत मन शांत आणि आनंदित होते.

देवी चंद्रघंटेची कथा
कथांनुसार, देवी दुर्गेचे पहिले स्वरुप देवी शैलपुत्री, दुसरे स्वरुप देवी ब्रम्हचारिणी असून यांनी भगवान शंकराला प्राप्त केले होते. ज्यावेळी देवी ब्रम्हचारिणी भगवान शंकरांना पतीच्या रुपात प्राप्त करताना आदिशक्तीचे रुप धारण करते. देवी दुर्गेने देवी चंद्रघंटेचा अवतार अशावेळी घेतला होता जेव्हा संसारात दैत्यांचा विनाश अधिक वाढला होता. त्यावेळी महिषासुरचे भयंकर युद्धही देवांसोबत सुरू होते. महिषासुराला देवराज इंद्राचे सिंहासन हवे होते. यामुळेच युद्ध सुरु होते.

अशी झाली देवी चंद्रघंटेची उत्पत्ति
ज्यावेळी देवांना महिषासुराची इच्छा कळली असता तेव्हा ते त्रस्त झाले. यावेळी देवता ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांच्याकडे गेले असता ते क्रोधित झाले. क्रोध आल्यानंतर तीन मुखांतन जी उर्जा निर्माण झाली यामधून एक देवी अवतरली. या देवीला भगवान शंकरांने आपले त्रिशूळ, भगवान विष्णूंनी आपले चक्र, इंद्राने आपली घंटा, सुर्याने आपले तेज आणि तलवार, सिंह प्रदान केले. यानंतर देवी चंद्रघंटेने महिषासुरचा वध करत देवांची रक्षा केली.

आणखी वाचा : 

नवरात्रीत ऑफिसला नेसण्यासाठी Aishwarya Narkar च्या साड्यांचे 8 डिझाइन

नवरात्रीची दुसरी माळ, देवी ब्रह्मचारिणीच्या पूजा विधीसह मंत्र जपबद्दल घ्या जाणून