National Youth Day 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी खास मराठमोळे संदेश

| Published : Jan 12 2025, 08:54 AM IST / Updated: Jan 12 2025, 08:56 AM IST

swami vivekananda punyatithi
National Youth Day 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी खास मराठमोळे संदेश
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Swami Vivekananda Jayanti 2025 : संपूर्ण भारतात आज (12 जानेवारी) राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवा.

National Youth Day 2025 Messages in Marathi : भारतात वर्ष 1984 पासून प्रत्येक वर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा खास दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि देशभरातील तरुणांना समर्पित आहे.

खरंतर, 12 जानेवारी 1863 मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. विवेकानंद यांची जयंती पाहता भारत सरकारने 12 जानेवारील राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. या दिवसाचे खास उद्देश असे की, तरुणांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना भावी आयुष्यासाठी प्रेरित करणे. असे मानले जाते की, कोणत्याही राष्ट्राच्या निर्माणासाठी सर्वाधिक मोठा वाटा तरुणांचा असतो. अशातच यंदाच्या राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त मित्रपरिवाराला काही खास संदेश पाठवा.

राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त खास संदेश

  • बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे.
    हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात
    ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे
    राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
  • स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा.
    लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या.
    एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
    राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!

  • “आपल्या स्वतःच्या स्वभावाशी खरे असणे हा सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.”
    राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • खर्‍या यशाचे, खर्‍या आनंदाचे महान रहस्य हे आहे: जो पुरुष किंवा स्त्री परत न मागतो, पूर्णपणे निस्वार्थी व्यक्ती, तो सर्वात यशस्वी आहे.
  • प्रत्येक गोष्टीचा शेवट सुंदर असतो,
    जर तो सुंदर नसेल तर तो अंत नसतो,
    म्हणून जोपर्यंत सुंदर शेवट मिळत नाही,
    तोपर्यंत मेहनत करत रहा, यश तुमची वाट पाहतंय…
    राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आणखी वाचा : 

मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत का साजरी करतात?

Makar Sankranti 2025 निमित्त दारापुढे काढण्यासाठी सोप्या 8 रांगोळी