फ्रीझी हेअर केसांची अशी स्थिती आहे ज्यामध्ये केस कोरडे आणि निर्जीव झाल्यासारखे दिसतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. पावसाळ्यात फ्रिझी हेअरची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया…
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी योग्य शॅम्पू आणि कंडीशनरची निवड करा. ज्यामध्ये केस हाइड्रेट ठेवणारे इंग्रीटिएंड्सचा वापर केलेला असेल.
केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरुनही फ्रिझी हेअरच्या समस्येपासून सुटका होत नसल्यास केस धुण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. याशिवाय काही घरगुती उपायही करू शकता.
केस धुतल्यानंतर लगेच केस विंचरत असाल तर यामुळे अत्याधिक प्रमाणात केस गळू शकतात. अशातच के धुतल्यानंतर कंगव्याने लगेच केस विंचरणे टाळा.
फ्रिझी हेअर पासून दूर राहण्यासाठी आणि केसांची चमक पुन्हा वाढवण्यासाठी एलोवेरा जेल, दही, नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करु शकता.
पावसाळ्यात फ्रिझी हेअरच्या समस्येपासून दूर राहण्यााठी हेअर केअर रुटीन फॉलो करावे. जेणेकरुन केसांची चमक वाढण्यासह केसांचे आरोग्य राखले जाईल.