देशभरात आज (29 जुलै) नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पण सोशल मीडियावर नागपंचमीनिमित्त काही मीम्स तुफान व्हायरल होत आहेत.
Nag Panchami 2025 Memes : प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. आज नागपंचमी असून या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नाग देवतेचे हिंदू धर्मातील महत्व पाहता त्यांना दुध आणि लाह्यांसह गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. या पूजेमुळे आयुष्यातील दु:ख दूर होत घरात सुख-शांती येते असे मानले जाते. पण सोशल मीडियावर आज असणाऱ्या नागपंचमी निमित्त काही मीम्स तुफान व्हायरल होत आहेत.
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…


तर नागपंचमीच्या दिवशी मजेशीर मीम्स व्हायरल होत राहतात. पण नागपंचमीला असणाऱ्या धार्मिक महत्वामुळे हा सण मोठ्या प्रमाणात देशभरात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने कालसर्प दोष आणि सापाची वाटणारी भीती दूर होते असे मानले जाते. याशिवाय पौराणिक मान्यतेनुसार, नागाला पाताल लोकातील देवता मानले जाते.


