सार

Nag Panchami 2024 : नागपंचमी येत्या 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भारतात अनेक नाग मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे दरवाजे केवळ नागपंचमीच्याच दिवशी खुले केले जातात. जाणून घेऊया मंदिराचा इतिसाह आणि अख्यायिका.

Nagchandreshwar Mandir History : नागपंचमी येत्या 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भारतात अनेक नाग मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे दरवाजे केवळ नागपंचमीच्याच दिवशी खुले केले जातात. जाणून घेऊया मंदिराचा इतिसाह आणि अख्यायिका.

श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून या काळात भगवान शंकरांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. याशिवाय देशभरातील शंकरांच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यंदा नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. अशातच भारतातील असे एक मंदिर आहे जेथे केवळ नागपंचमीच्याच दिवशी त्याचे दरवाजे उघडले जातात. खरंतर, उज्जैनमधील नागचंद्रेश्वर मंदिर नागपंचमीच्या 24 तास खुले ठेवले जाते. या मंदिरात नागांचा राजा तक्षक नाग विराजमान आहे असे सांगितले जाते.

नागचंद्रेश्वर मंदिराची खासियत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे. येथे नागचंद्रेश्वर महादेव विराजमान आहेत. हे एकमेव असे मंदिर आहे जेथे भोलेनाथ दशमुखी सर्पच्या आसनावर भगवान शंकर, देवी पार्वती संपूर्ण परिवारासह विराजमान आहेत. ही मूर्ती जवळजवळ 11 व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे.

नेपाळ येथून आलीय ही अद्भूत मूर्ती
असे सांगितले जाते की, परमार राजा भोजने 1050 ईसवी सनच्या काळात मंदिराची उभारणी केली होती. याशिवाय अद्भूत मूर्ती नेपाळ येथून आणली होती. यानंतर सिंधिया घराण्यातील महाराज राणोजी सिंधिया यांनी 1732 ईसवी सनमध्ये मंदिराचा जीर्णोध्दार केला होता.

वर्षातून एकदाच खुलतात मंदिराचे दरवाजे
नागचंद्रेश्वर मंदिर केवळ नागपंचमीच्या दिवशी खुले केले जाते. यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार, सर्पराज तक्षक यांनी भगवान शंकरांसाठी कठोर तपस्या केली होती. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होत तक्षक नागाला अरत्वाचे वरदान दिले होते. तेव्हापासून तक्षक राजाने शंकरांच्या सानिध्यात राहण्यास सुरुवात केली होती. पण शंकरांना एकांतामध्ये राहणे पसंत होते. यामुळेच तक्षक राजा वर्षातून एकदाच भगवान शंकरांना भेटण्यासाठी येऊ लागले. यामुळेच नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदा उघडले जातात.

दर्शन केल्याने कालसर्प दोष दूर होतो
व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शन करू शकता. येथे विधिवत पूजा केल्याने काही समस्याही दूर होऊ शकता.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Nag Panchami 2024 दिवशी करा हे 4 उपाय, कालसर्प दोष होईल दूर

भारतातील रहस्यमयी नाग मंदिर, महाभारताच्या काळाशी संबंधित आहे इतिहास