भारतातील रहस्यमयी नाग मंदिर, महाभाराताच्या काळाशी संबंधित आहे इतिहास
- FB
- TW
- Linkdin
कुठे आहे नागदेवतेचे अनोखे मंदिर
हिंदू धर्मात नागाला देवता मानत त्यांची पूजा केली जाते. आपल्या देशात काही प्रसिद्ध नाग मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे केरळातील आलापुज्हा (अलेप्पी) शहरापासून 37 किलोमीटर दूरवर स्थित आहे. या मंदिराला मन्नारशाला नाग मंदिर असे म्हटले जाते. या मंदिराची खासियत अशी की, येथे हजारो नागांच्या मुर्ती आहेत. जाणून घेऊया मंदिरासंदर्भातील काही खास गोष्टी.
30 हजारांहून अधिक नाग मुर्ती
सर्वसामान्यपणे कोणत्याही मंदिर देवी-देवतांच्या एक अथवा दोन मुर्ती असतात. पण मन्नारशाला नाग मंदिरात 30 हजारांहून अधिक नागांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर 16 एकरपेक्षा अधिक जमिनीवर विस्तारलेले आहे. या मंदिरात नागपंचमीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. येथे मुख्य नागदेवता नागराज आणि नागयक्षी आहे.
मुलं नसलेल्या व्यक्तींची इच्छा होते पूर्ण
ज्या व्यक्तींना मुलं नसते ते येथील मंदिरात हळदीपासून तयार करण्यात आलेल्या नागाची मुर्ती अर्पण करतात. याआधी पती-पत्नी मंदिर परिसरातील तलावात आंघोळ करुन ओलसर कपड्यांवर देवाचे दर्शन करतात. येथे कांस्याचे एक भांडे ठेवलेले असते त्याला उरूली असे म्हटले जाते. हे भांडे पती-पत्नी पालथे घालतात आणि मुलं झाल्यानंतर ते सुलट करुन आपल्या इच्छेनुसार देवाला काहीतरी वस्तू अर्पण करतात.
खांडव वनातून पळून आले होते सर्प
महाभारतात खांडव वनाने वर्णन करण्यात आले आहे. खांडव वनात एकेकाळी साप रहायचे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन खांडव वनाला आपल्या बाणांनी जाळून टाकले होते. तेव्हा खांडव वनात राहणारे सर्व साप इथेतिथे पळून गेले. अशातच साप केरळात येऊन स्थित झाले. मन्नारशाला मंदिरात नम्बूदिरी परिवारातील व्यक्तीच पूजा करतात. असेही म्हटले जाते की, या परिवारातील एका स्री च्या गर्भातून नागराज यांनी जन्म घेतला होता.
आणखी वाचा :
Shravan 2024 : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचा इतिहास, श्रावणात नक्की करा दर्शन
भारतातील 5 रहस्यमयी नाग मंदिर, पूजा केल्याने दूर होतात आयुष्यातील मोठे दोष