भारतातील 5 रहस्यमयी नाग मंदिर, पूजा केल्याने दूर होतात आयुष्यातील मोठे दोष
- FB
- TW
- Linkdin
नागचंद्रेश्वर मंदिर, उज्जैन
उज्जैनमधील महाकाल मंदिरात नाग देवतांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. जे संपूर्ण वर्षभरात केवळ नागपंचमीच्याच दिवशी खुले केले जाते. हिंदू मान्यतेनुसार, या मंदिरात तक्षक नाग विराजमान आहे. महाकाल यांच्या मंदिरात नागचंद्रेश्वर यांचे दर्शन तिसऱ्या मजल्यावर घेता येते. येथे नाग देवता भगवान शंकरांच्या गळ्याभोवती बसलेले आहेत.
पटनीटॉपमधील नाग मंदिर
नाग देवतेचे आठ दशक जुने असे मंदिर जम्मूमधल पटनीटाप येथे आहे. हिंदू मान्यतेनुसार, नाग मंदिरात नाग देवतेची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व कष्ट दूर होत इच्छा पूर्ण होतात. यामुळेच नागपंचमीच्या दिवशी नाग देवतांची मंदिरात दर्शनासाठी फार मोठी गर्दी होते. मंदिरासंदर्भात मान्यता अशीही आहे की, येथेही इच्छाधारी नाग देवतांनी ब्रम्हचारी रुपात कठीण तप केला होता. यानंतर पिंडीचे रुप धारण केले होते. तेव्हापासून पटनीटॉपमधील नाग मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही.
तक्षक नाग मंदिर, प्रयागराज
हिंदू मान्यतेनुसार, पाताळात राहणाऱ्या 8 प्रमुख नागापैकी एक असणाऱ्या तक्षक नागाला सर्व नागांचा स्वामी मानले जाते. तक्षक नागाचे मंदिर उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आहे. नागपंचमीच्या दिवशी येथे दर्शन केले तरीही कुंडलीतील कालर्सप दोष दूर होतो असे मानले जाते.
धौलीनाग मंदिर, उत्तराखंड
धौलीनाग मंदिर उत्तराखंड येथील बागेश्वर येथे आहे. या मंदिराचा संबंध कालिया नागाशी आहे. हिंदू मान्यतेनुसार, धौलीनाग कालिया नागाचा सर्वाधिक मोठा पुत्र आहे. धौली नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. स्थानिकांच्या मते, धौलीनागाची पूजा केल्याने काही नैसर्गिक आपत्ती येण्यापासून संरक्षण होते.
मन्नारशाला सर्प मंदिर, केरळ
दक्षिण भारतातील नागांचे मन्नारशाला सर्प मंदिर आहे. या मंदिरात नाग देवतांच्या हजारो मूर्ती आहेत. हिंदू मान्यतेनुसार, या मंदिराला महाभारताच्या काळाशी जोडले जाते. अशीही मान्यता आहे की, मन्नारशाला सर्प मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याने संतती प्राप्ती होते स्थानिक मंदिराला स्नेक टेम्पल असे म्हणतातत. याशिवाय कालसर्प दोष असल्यास मंदिरात विशेष पूजा केली जाते.
आणखी वाचा :
Shravan 2024 : यंदाच्या 5 श्रावण सोमवारी ही शिवमूठ वाहिली जाणार
August 2024 Festival List : ऑगस्ट महिन्यात श्रावणासह सणवारांची लिस्ट पाहा