सार

August 2024 Festival List : वर्ष 2024 मधील आठव्या महिना म्हणजेच ऑगस्टमध्ये काही सणवार साजरे केला जाणार आहेत. यामध्ये श्रावण, नागपंचमी ते रक्षाबंधनसारखे प्रमुख सण असणार आहेत. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील सणवारांची लिस्ट...

August 2024 Festival List : अवघ्या चार ते पाच दिवसांनी नवा महिना ऑगस्ट सुरू होणार आहे. यंदाचा ऑगस्ट महिना हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वपूर्ण असून श्रावण महिना सुरू होणार आहे. याशिवाय काही मोठे सणउत्सवही साजरे केले जाणार आहे. श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार आणि शनिवारलाही फार महत्व आहे. या काळात बहुतांशजण उपवास करण्यासह भगवान शंकराची पूजा करतात. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या सण-उत्सवांची लिस्ट सविस्तर...

  • 4 ऑगस्ट - दर्श अमावस्या
  • 5 ऑगस्ट - श्रावण मासारंभ
  • 8 ऑगस्ट - विनायक चतुर्थी
  • 9 ऑगस्ट - नागपंचमी
  • 10 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
  • 12 ऑगस्ट - श्रावणी सोमवार
  • 14 ऑगस्ट - पतेती
  • 15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन, पारशी नुतन वर्ष
  • 16 ऑगस्ट -पुत्रदा एकादशी
  • 17 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
  • 19 ऑगस्ट - नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन
  • 20 ऑगस्ट - श्रावणी सोमवार
  • 22 ऑगस्ट - संकष्ट चतुर्थी
  • 24 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
  • 26 ऑगस्ट -श्रीकृष्ण जयंती
  • 27 ऑगस्ट - गोपाळकाला
  • 31 ऑगस्ट - श्रावणी शनिवार

ऑगस्ट महिन्यातील श्रावणी सोमवार
येत्या 5 ऑगस्टपासून श्रावणी सोमवार सुरू होणार आहे. दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट आणि तिसरा 19 ऑगस्टला असणार आहे. याशिवाय 19 ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार असून याच दिवशी रक्षाबंधनही आहे.

कधीपासून सुरू होणार भाद्रपद महिना?
हिंदू पंचांगातील सहावा महिना भाद्रपत ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑगस्टपासून भाद्रपद महिन्याची सुरुवात होईल.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

26 जुलैचा महाप्रलच नव्हे भारताच्या इतिहासात या 5 मोठ्या घटनांचीही नोंद

बाथरुममधील या 7 वस्तूंमुळे घरात निर्माण होते आर्थिक समस्या, आजच काढा