सार
मायक्रोप्लास्टिकचे लहान-लहान कण हवा किंवा पोटाच्या माध्यमातून शरिरात शिरकाव करतात. यामुळे हृदयविकाराच झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढला जाऊ शकतो.
Health Care : आजकाल बदलत्या जीवनशैलमुळे नागरिकांमध्ये हृदयासंबंधिक समस्या अधिक वाढल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यापैकी एक कारण म्हणजे मायक्रोप्लास्टिक्सही (Microplastics) असू शकतात. खरंतर, मायक्रोप्लास्टिक्सचे लहान-लहान कण हवा किंवा पोटाच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतात. यामुळेच हृदयासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. जसे की, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक. जाणून घेऊया मायक्रोप्लास्टिक्स कशाप्रकारे आरोग्याला नुकसान पोहोचवतात याबद्दल सविस्तर...
मायक्रोप्लास्टिक पोहोचवतात हृदयाला नुकसान
- मायक्रोप्लास्टिक्स हृदयाच्या आरोग्यासाठी काही प्रकारे नुकसानदायक ठरू शकते.
- न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या व्यक्तींच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक्स आढळते त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढला जातो.
- शरिरात नॅनोप्लास्टिक किंवा मायक्रोप्लास्टिक असल्यास काहीवेळेस प्लाक जमा होतात. यामुळे शरिरातील रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. अशातच हृदयासंबंधित समस्या वाढू लागतात.
- शरिरात मायक्रोप्लास्टिक आढळून आल्यास काहीवेळेस प्रीमॅच्युअर डिलिवरी होण्याचा धोका वाढला जातो.
कोठून येतात मायक्रोप्लास्टिक
मायक्रोप्लास्टिक आरोग्याला काही प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. हे मायक्रोप्लास्टिक कॉस्मेटिक्स, लिपबाम आणि प्रकारच्या प्लास्टिकच्या बॉटलच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतात. काहीवेळेस मायक्रोप्लास्टिकचे लहान-लहान कण हवेच्या माध्यमातून शरिरातील वेगवेगळ्या अवयवयांपर्यंत प्रवेश करतात. जे हृदयासह मेंदूलाही नुकसान पोहोचवतात.
मायक्रोप्लास्टिकमुळे होणाऱ्या समस्या
- मायक्रोप्लास्टिक एक प्रकारचे केमिकल असते. जे शरिरात प्रवेश करत रक्ताभिसरच्या प्रक्रियेवर परिणाम करतात.
- मायक्रोप्लास्टिकमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या समस्या वाढल्या जाऊ शकतात.
- किडनीसह मेंदूवरही मायक्रोप्लास्टिकमुळे परिणाम होतो.
- मायक्रोप्लास्टिक शरिरात गेल्यास रोगप्रतिकारक शक्तीही बिघडली जाऊ शकते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
Healthy Tips : उष्मघात आणि झळांपासून अशी घ्या स्वतःची काळजी
लहान मुलांच्या पोटात जंत का होतात? यावर उपाय काय आणि लक्षणे कसाही ओळखायची
Brown Sugar VS White Sugar: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसर कोणती शुगर आरोग्याला अधिक