सार
अनेकांना आजारांचा धोका कमी करण्यासाठी साखरेच्याऐवजी गूळ, मध किंवा ब्राउन शुगरचा आपल्या आहारात समावेश करतात. ब्राउन शुगर आणि सामान्य साखर यामध्ये नेमका काय फरक, याबाबत अनेकजणांच्या मनात शंका असते.
गोड पदार्थ अनेकांना प्रचंड आवडतात, आवडत नाही असे खूप कमी लोकं या पृथ्वीवर आहेत. भारतात तर गोड पदार्थांची कायम रेलचेल असते , कारण आपल्याकडे सण समारंभच तेवढे असतात. आपल्या पाक संस्कृतीत साखरेचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. मात्र आता या अतिसेवनामुळे अनेकांना मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या उद्भवत आहेत. म्हणून अनेक डॉक्टर साखरेचा अतिवापर टाळण्याचा सल्ला देतात. मग मी ब्राउन शुगर खाल्ली तर चालेल का? अशीही विचारणा डॉक्टरांना केली. यासाठी ब्राउन शुगर किंवा व्हाईट शुगर आपल्या शरीराला किती फायदेशीर हे पाहणे महत्वाचे आहे.
साखरेच्या अतिसेवनामुळे काय होते ?
- वजन वाढणे
- हृदयविकार
- टाइप २ मधुमेह
- रोगप्रतिकार शक्ती कमकुवत पडते
- तणाव वाढणे,
ब्राउन शुगर म्हणजे काय?
सामान्य साखरेप्रमाणेच ब्राउन शुगरही उसापासूनच तयार केली जाते. ही प्रक्रिया न केलेली साखर असते. यामध्ये मोलॅसिस असल्याने याचा रंग तपकिरी असतो. यामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम यांची मात्रा सामान्य साखरेपेक्षा अधिक असते. तसेच सामान्य साखरेच्या तुलनेत यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते. ब्राउन शुगरचेही तीन प्रकार आहेत, ते म्हणजे, अनरिफाईंड ब्राउन शुगर, डेमेरारा ब्राउन शुगर आणि डार्क ब्राउन शुगर.
ब्राउन शुगर आणि सामान्य साखरेमधील अधिक आरोग्यदायी साखर कोणती?
ब्राउन शुगर आणि सामान्य साखर या दिसायला वेगवेगळ्या असल्या तरीही त्यातील पौष्टिक मूल्यांच्याबाबतीत त्या जवळपास सारख्याच आहेत. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरमध्ये अतिरिक्त खनिजे असतात. परंतु ते इतक्या कमी प्रमाणात आहेत की आपल्याला त्यांचा विशेष असा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही कोणतीही साखर वापरू शकता. मात्र कोणत्याही स्वरूपात साखरेचे सेवन कमीत कमी करणे हेच आपल्या आरोग्याच्यादृष्टीने अधिक फायदेशीर आहे.व्यक्तीने एका दिवसात जास्तीत जास्त २ चमचे म्हणजेज १० ग्राम साखरेचे सेवन करणे पुरेसे आहे.
आणखी वाचा:
Health : रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका, या गोष्टीमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास
खजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
प्रदोष काळात भद्र असल्यामुळे केवळ होळीची पूजा करता येणार, मात्र होळी दहन रात्री ११ नंतर