उन्हाळी शिबिरातून मुलांना करा हायटेक; रोबोटिक्स आणि ऍनिमेशनचे धडे

| Published : Mar 28 2024, 12:33 PM IST

summer camp

सार

संवाद कौशल्य, अभिनय कौशल्य, कथाकथन, लेखन, संस्कारक्षम गोष्टी, अभिवाचन, मराठी शब्दसंग्रह वाढविणे, कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण बच्चे कंपनीला या शिबिरांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि अनुभवाचे धडे दिले जातात.

लाईफस्टाईल डेस्क : उन्हाळ्यात लहान मुलांना शिबिरात पाठवणे अत्यंत साहजिक आहे.पूर्वीच्या काळातील शिबिरांचे अभ्यासक्रम आणि आताच्या बदलत्या टेकनॉलॉजिच्या काळातले अभ्यासक्रम यात मोठी तफावत आहे. मुलांना नाट्यभिनयापासून ते कथाकथनापर्यंत... नृत्यापासून ते गिर्यारोहणापर्यंतचे प्रशिक्षण आपण उन्हाळी सुटीत घेतोच... पण, आता चक्क रोबोटिक्स आणि ऍनिमेशनचे प्रशिक्षण उन्हाळी शिबिरात घेता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कलांवर आधारित प्रशिक्षण शिबिरे तर होणार आहेतच. परंतु, यंदा संगणकीय ज्ञानापासून ते सोशल मीडियाच्या काळजीपूर्वक वापरापर्यंतचे प्रशिक्षण मुलांना शिबिरांमधून मिळणार असल्याने आपल्या मुलांना उन्हाळी शिबिरांमधून हायटेक होता येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांसाठी उन्हाळी शिबिरांची रेलचेल सुरु झाली असून, शिबिरांची तयारीही पूर्ण झाली आहे.अनेक शिबिरे एप्रिल पासून सुरु होत असून ऑनलाइन शिबिरांसह ऑफलाइन शिबिरे देखील मोठया प्रमाणात होत असतात. आता या शिबिरांचे बुकिंगही सुरू झाले आहे.

संवाद कौशल्य, अभिनय कौशल्य, कथाकथन, लेखन, संस्कारक्षम गोष्टी, अभिवाचन, मराठी शब्दसंग्रह वाढविणे, कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण बच्चे कंपनीला या शिबिरांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि अनुभवाचे धडे दिले जातात. 5 ते 15 वर्षांवरील मुलांसाठी ही शिबिरे असतात. नृत्य, गायन, अभिनय, पाककला, क्रीडा, गिर्यारोहण, छायाचित्रण, व्हिडीओग्राफी... अशी भन्नाट शिबिरेही बच्चे कंपनीला नक्कीच आनंद देणारी ठरतात.

निवासी शिबिरेही रंगणार:

काही संस्थांकडून निवासी शिबिरेही भारावली जातात. यात देखील तुम्ही मुलांना पाठवू शकतात. 10 ते 15 दिवसांची ही निवासी शिबिरे निसर्गरम्य ठिकाणी होत असतात. कोकण भाग, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी निवासी शिबिरे भारावली जातात. यामध्ये मुलांना निसर्गाच्या भटकंतीसह त्यांना विविध गोष्टींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहेत.

आणखी वाचा :

April 2024 Festival List : एप्रिल महिन्यात साजरे केले जाणार हे सण-उत्सव, हिंदू नववर्ष 2081 होणार सुरू

लग्नसराईत ट्राय करा ही ज्वेलरी आणि उमटवा तुमचा रॉयल ठसा !