यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या कधी? जाणून घ्या तारीख आणि वेळ

| Published : Nov 27 2024, 11:52 AM IST

image_of_tarpan

सार

सध्या हिंदू पंचांगामधील नववा महिना मार्गशीर्ष सुरू आहे. या महिन्यातील अमावस्या तिथी दोन दिवस असणार आहे. यामुळे श्राद्ध आणि स्नान-दान कधी करावे याबद्दल काहींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर...

Margashirsha Amavasya 2024 Date : धर्म ग्रंथांनुसार, हिंदू पंचांगामधील नवव्या महिन्याला मार्गशीर्ष असे म्हटले जाते. या महिन्याचे स्वामी खुद्द भगवान विष्णू आहे. सध्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू असून अखेरीस अमावस्या असणार आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या दोन दिवस असणार आहे. यामुळे काहींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालीय की, कधी श्राद्ध आणि स्नान-दान करावे. याबद्दल उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांनी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येची तिथी कधीर्यंत असणार आणि श्राद्ध, स्नान-दान कधी करावे याबद्दल सांगितले आहे.

यंदा मार्गशीर्ष महिन्याती अमावस्या कधी?
पंचांगानुसार, यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या 30 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 01 डिसेंबरला सकाळी 11 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे. यामुळेच अमावस्या दोन दिवस असणार आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील श्राद्ध कधी?
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार आपल्या धर्म ग्रंथांमध्ये श्राद्ध करण्यासाठी दुपारची वेळ सर्वाधिक उत्तम असल्याचे सांगितले आहे. श्राद्ध नेहमीच कुतपकाळात करावे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येच्या तिथीचा कुपतकाळ 30 नोव्हेंबरला असणार आहे. यानुसार पितरांच्या शांतीसाठी केले जाणारे श्राद्ध आणि पिंडदानासाठी 30 नोव्हेंबरची तारीख योग्य आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील स्नान-दान
ज्योतिषाचार्या पं. द्विवेदी यांच्यानुसार, कोणत्याही तिथीला स्नान-दान उदया तिथी पाहून केले जाते. म्हणजेच ज्या तिथीमध्ये सुर्योदय असे लिहिलेले त्यावेळी स्नान-दान करावे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येच्या तिथीचा सुर्योदय 1 डिसेंबरला आहे. या दिवशी तुम्ही स्नान-दान करू शकता.

आणखी वाचा : 

काय सांगता! प्रेम नव्हे राग आणि भांडणाचे प्रतीक आहे Pink Color

हेल्दी त्वचेसाठी करा हळद आणि तूपाचे सेवन, वाचा हे देखील फायदे