मेकअप ब्रश ते कंगवा अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची Expiry असते? जाणून घ्या वस्तू वापरण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती

| Published : May 31 2024, 07:50 AM IST / Updated: May 31 2024, 07:58 AM IST

5 things you forget have an expiry date
मेकअप ब्रश ते कंगवा अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची Expiry असते? जाणून घ्या वस्तू वापरण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

प्रत्येकाच्या घरात दैनंदिन आयुष्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू असतात. याच वस्तूंचा दीर्घकाळ वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, मेकअप ब्रश ते कंगवा अशा काही वस्तूंची देखील एक्सपायरी असते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…

Daily Lifestyle Hacks : एक्सपायरी डेट सर्वसामान्यपणे आपल्याला औषधांच्या पाकिटावर ते पाकिटबंद फूड्सवर लिहिलेली असते. कारण एक्सपायरी डेटमुळे कळते की, वस्तू किती काळापर्यंत तुम्ही वापर करू शकता. अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशातच दैनंदिन आयुष्यासाठी लागणाऱ्या बारीक-बारीक गोष्टींची देखील एक्सपायरी असते. याकडे बहुतांशजण दुर्लक्ष करतात. यामुळे वस्तूंवर बॅक्टेरिया निर्माण होत तुम्ही आजारी पडता.

खरंतर, बहुतांशजण दररोजसाठी लागणाऱ्या वस्तू दीर्घकाळ वापरतात, जोवर त्या खराब किंवा मोडल्या जात नाहीत. अशा वस्तूंची एक्सपायरी नसते म्हणून दीर्घकाळ वापरल्या जातात. जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या योग्य वेळी आणि एका काळानंतर बदलल्या पाहिजेत.

उश्या
प्रत्येकाच्या घरात उश्यांचा वापर केला जातो. काहीजणांच्या घरी वेगवेगळ्या आकाराच्या अथवा डिझाइनच्या उश्या देखील असतात. अशातच उश्यांचे कव्हर आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा धुण्यासाठी टाकले जाते. पण उशी दीर्घकाळ वापरली जाते. यावर लागलेल्या माती, धूळीमुळे बॅक्टेरिया वाढण्यास सुरुवात होते. याच कारणास्तव केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे अशा समस्या उद्भवतात. यामुळे दोन ते तीन महिन्यानंतर उश्या बदलल्या पाहिजेत असा सल्ला दिला जातो.

मेकअप ब्रश
बहुतांश महिला एकच मेकअप ब्रश दीर्घकाळ वापरतात. अथवा वापरल्यानंतर स्वच्छ न करणे किंवा दुसऱ्यांसोबत शेअर देखील केला जातो. खरंतर, एकच ब्रश सातत्याने वापरणे तुमच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, त्वचेसंबंधित अ‍ॅलर्जी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. एवढेच नव्हे डोळे आणि आरोग्याचेही नुकसान होऊ शकते. यामुळे एक ते दीड वर्षांनी मेकअप किटमधील ब्रश बदलले पाहिजेत.

टूश ब्रश
टूथ ब्रशचा वापर किती दिवस करावा हे माहितेय का? कारण बहुतांशजण ब्रश खराब होत नाही तोवर वापरतात. पण आरोग्य तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येक तीन महिन्यानंतर आपला टूथब्रश बदलावा. अन्यथा तोंडासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

भांडी धुण्याचा स्पंज
भांडी घासण्याचा स्पंज अथवा स्क्रबर देखील खराब होत नाही तोवर वापरला जातो. खरंतर, स्क्रबरवर बॅक्टेरिया लगेच निर्माण होण्याची भीती असते. यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे दोन महिन्यानंतर भांडी धुण्याचा स्पंज बदलणे योग्य आहे.

कंगवा
कंगवा किती दिवसानंतर बदलावा याचे ठोस उत्तर फार कमी जणांना माहिती असावे. दीर्घकाळ एकच कंगवा वापरल्याने अथवा त्याची स्वच्छता न ठेवल्यास केसांच्या मूळांना नुकसान पोहोचले जाऊ शकते. यामुळे केसांमध्ये फंगल इंफेक्शन किंवा केस गळतीची समस्या वाढण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : 

World No Tobacco Day 2024 : "मुलांना तंबाखू उद्योगापासून लांब ठेवणे" यंदाचे डब्लूएचओचे जागतिक तंबाखू विरोधी दिनीचे उद्दिष्ट

Cholesterol Level राहिल नियंत्रणात, प्या हे 5 हेल्दी ज्यूस