Makar Sankranti 2025 : यंदा 14 की 15 तारखेला संक्रांत? जाणून घ्या शुभ मुहूर्त

| Published : Jan 03 2025, 02:12 PM IST / Updated: Jan 03 2025, 02:14 PM IST

Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : यंदा 14 की 15 तारखेला संक्रांत? जाणून घ्या शुभ मुहूर्त
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मकर संक्रातचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शुभ दिनी दानालाही फार महत्व आहे. अशातच यंदा मकर संक्रांत 14 की 15 जानेवारीला असा प्रश्न बहुतांशजणांना पडला आहे. जाणून घेऊया योग्य तारखेसह शुभ मुहूर्ताबद्दल सविस्तर...

Makar Sankranti 2025 Date and Shubha Muhurat : हिंदू धरमात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एकूण 12 संक्रांत साजरी केल्या जातात. ज्यावेळी धनु राशीतून सुर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते. मकर संक्रांतचा सण प्रत्येक वर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. देशभरात मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.

यंदा मकर संक्रांत 2025 कधी?

यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी स्नान आणि दानाचे फार महत्व आहे. अशी मान्यता आहे की, मकर संक्रातच्या दिवशी दान केल्याने पापांमधून मुक्ती मिळत सौभाग्य लाभते.

मकर संक्रातचा शुभ मुहूर्त

मकर संक्रातवेळी दान करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 09 वाजून 03 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय महापुण्य काळचा शुभ मुहूर्त सकाळी 09 वाजून 03 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 48 मिनिटांपर्यंत असणार आहे.

स्नानाचा शुभ मुहूर्त

मकर संक्रांतवेळी स्नान ब्रम्ह मुहूर्त सकाळी 05 वाजून 27 मिनिटांपासून ते सकाळी 06 वाजून 21 मिनिटांपर्यंत असणार आहे.

मकर संक्रातवेळी स्नान आणि दानासाठी अन्य मुहूर्त

  • अभिजित मुहूर्त दुपारी 12.09 ते 12.51 मिनिटांपर्यंत
  • विजय मुहूर्त- दुपारी 02.`15 ते 2.57 मिनिटांपर्यंत
  • अमृत काळ- संध्याकाळी 07.55 ते रात्री 09.29 मिनिटांपर्यंत

दरम्यान, मकर संक्रांतवेळा राहुकाळ दुपारी 03 वाजून 08 मिनिटांपासून ते दुपारी 04 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

पार्टीवेअर ते कॅज्युअल लूकसाठी सोनाली कुलकर्णीच्या 8 साड्या, पाहा PICS

राहु-केतूच्या दोषापासून दूर राहण्यासाठी करा हे 6 उपाय

Read more Articles on