सार

मकर संक्रातींचा सण येत्या 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या मकर संक्रांतीच्या सणाला फार महत्त्व आहे. यंदाच्या मकर संक्रांतीवेळी कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आणि कोणी सावध राहावे याबद्दल जाणून घेऊया अधिक....

Makar Sankranti 2024 Horoscope : मकर संक्रांतीच्या सणादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यंदा सूर्य 15 जानेवारीला, सोमवारी सकाळी मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.

सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा याचा सर्व राशींवर शुभ-अशुभ रुपात परिणाम होतो. काही लोकांची यावेळी चांदी होतो तर काहींचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या सणावेळी कोणत्या राशींची होणार चांदी आणि कोणत्या राशीतील व्यक्तींना सावध राहावे लागणार याबद्दल अधिक....

या राशीतील व्यक्तींना होणार फायदा
सूर्य राशी बदलणार तेव्हा मेष राशी, मिथून राशी, सिंह राशी, वृश्चिक राशी आणि मीन राशीतील व्यक्तींना फायदा होणार आहे. या पाचही राशींच्या व्यक्तींची चांदी होणार असून धन लाभाची शक्यता आहे. याशिवाय जुने वाद मिटणार आहेत.

आरोग्यासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्य असेल.

या राशीतील व्यक्तींनी राहा सावध
सूर्य राशी बदलणार तेव्हा वृषभ राशी, कन्या राशी, मकर राशी आणि कुंभ राशींचे नुकसान होऊ शकते. या चारही राशींच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या सणावेळी सांभाळून राहावे. यावेळी शनि-सूर्याचा अशुभ योग होत असल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. याशिवाय धन हानि, नोकरी-व्यवसायाची स्थिती बिघडली जाऊ शकते.

या राशींसाठी असणार सामान्य स्थिती
कर्क राशी, तुळ राशी आणि धनु राशीसाठी मकर संक्रांतीचा दिवस सामान्य असणार आहे. या राशीतील व्यक्तींचे मकर संक्रांतीच्या दिवशी आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. पण लव्ह लाइफमध्ये समस्या येऊ शकतात. नोकरीमध्ये मनासारखे काम करता येणार नाही. यावेळी अनुभवी व्यक्तींचा सल्ला कामी येऊ शकतो. सासरच्या मंडळींसोबत वादाची स्थिती निर्माण होऊ शकते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Bhogi 2024 : भोगीचा सण का साजरा करतात?

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांना मेसेज, WhatsApp Message पाठवून द्या सणाच्या खास शुभेच्छा

Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या सणावेळी चुकूनही करू नका ही कामे