MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Mahashivratri 2026 : शिव-पार्वती विवाह महाशिवरात्रीवेळी झाला होता का? जाणून घ्या सत्य

Mahashivratri 2026 : शिव-पार्वती विवाह महाशिवरात्रीवेळी झाला होता का? जाणून घ्या सत्य

Mahashivratri Myth : दरवर्षी फाल्गुन महिन्यात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यावर्षी हा सण १५ फेब्रुवारी, रविवारी आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक मान्यता आहेत. त्यापैकी एक म्हणजे हा सण शिव-पार्वतीच्या विवाह उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Feb 06 2026, 10:37 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
महाशिवरात्रीबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या
Image Credit : Getty

महाशिवरात्रीबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या

Mahashivratri Myth And Facts: दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. हा शैव भक्तांचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी देशातील सर्व शिवमंदिरांमध्ये विशेष सजावट केली जाते. महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी जमते. महाशिवरात्रीचा उत्सव का साजरा करतात, याबद्दलही अनेक मान्यता आहेत. असं म्हणतात की महाशिवरात्री हे शिव-पार्वतीच्या विवाह उत्सवाचं प्रतीक आहे. पण काही विद्वान ही मान्यता खोडून काढतात. पुढे जाणून घ्या या मान्यतेमागील सत्य काय आहे…

24
महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचा विवाह झाला होता का?
Image Credit : Getty

महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचा विवाह झाला होता का?

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्या मते, सध्या अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा सण शिव-पार्वतीच्या विवाह उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो, जे पूर्णपणे चुकीचे आहे. शिव-पार्वतीचा विवाह कोणत्या तिथीला झाला होता, याबद्दल शिव महापुराणात सांगितले आहे. त्यानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला, सोमवारी शिव-पार्वतीचा विवाह झाला होता. त्यावेळी चंद्र, बुध लग्नात होते आणि रोहिणी नक्षत्र होते.

Related Articles

Related image1
महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराला चुकूनही वाहू नका हे फूल
Related image2
महाशिवरात्री: या अनोख्या शिवमंदिरांमध्ये पहा अजब परंपरा!
34
मग शिव-सतीचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता का?
Image Credit : Getty

मग शिव-सतीचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता का?

देवी पार्वतीसोबत विवाह करण्यापूर्वी महादेवाचा विवाह देवी सतीसोबत झाला होता. देवी सती प्रजापती दक्षाची मुलगी होती. देवी सतीने आपले वडील दक्षाच्या इच्छेविरुद्ध महादेवाशी विवाह केला होता. शिवपुराणानुसार, शिव-सतीचा विवाह चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला, रविवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात झाला होता. म्हणजेच शिव-सती विवाहाचाही महाशिवरात्रीशी काहीही संबंध नाही.

44
महाशिवरात्री का साजरी करतात?
Image Credit : Getty

महाशिवरात्री का साजरी करतात?

जर महाशिवरात्री हा शिव-पार्वतीच्या विवाहाचा उत्सव नाही, तर मग हा सण का साजरा करतात? याचे उत्तरही शिव महापुराणातच लिहिलेले आहे. त्यानुसार, एकदा ब्रह्मा आणि विष्णू स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागले. तेव्हा तिथे एक विशाल अग्नी लिंग प्रकट झाले. हे अग्नी लिंग शिवाचेच स्वरूप होते. त्या दिवशी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी होती. महादेव पहिल्यांदा लिंग रूपात प्रकट झाल्यामुळेच या दिवशी महाशिवरात्री सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.


Disclaimer : या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांकडून घेतली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना मानावे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Chaitra Navratri 2026 : तुमच्या प्रियजनांना पाठवा 75+ खास शुभेच्छा आणि शायरी, सण करा आणखी खास!
Recommended image2
Chanakya Niti : गुढीपाडव्याला या ठिकाणी चुकूनही जाऊ नका, कमावलेला मान-सन्मान एका क्षणात जाईल!
Recommended image3
Gudi Padwa 2026 : जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे खास महत्त्व
Recommended image4
Chaitra Navratri 2026 : घटस्थापनेसाठी ५ शुभ मुहूर्त, योग्य वेळ आणि तिथी लगेच नोट करा
Recommended image5
Daily Horoscope: मीन राशीत चतुर्ग्रही योग, ३ राशींना आर्थिक फटका बसणार, पाहा तुमचं राशीभविष्य
Related Stories
Recommended image1
महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराला चुकूनही वाहू नका हे फूल
Recommended image2
महाशिवरात्री: या अनोख्या शिवमंदिरांमध्ये पहा अजब परंपरा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved