महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराला चुकूनही वाहू नका हे फूल
येत्या 8 मार्चला महाशिवारात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकर यांच्यासह देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते.
बहुतांशजणांना शंकराच्या पिंडीवर कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत याबद्दल माहिती नसते. यामुळे भगवान शंकराची पूजा करूनही त्याचे फळ मिळत नाही.
शास्रांमध्ये कोणते फूल शंकराच्या पिंडीवर वाहू नये याबद्दल सांगितले आहे. याबद्दल जाणून घेऊया अधिक…
शिवभक्त शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही प्रकारची फूल वाहतात. गुलाब, चाफा किंवा कमळासह अन्य प्रकारची फूल वाहिली जातात.
भगवान शंकराला केतकीचे फूल कधीच वाहिले जात नाही. खरंतर एका श्रापामुळे केतकीचे फूल वाहण्यास मनाई आहे.
भगवान शंकराने केतकीच्या फूलाला श्राप दिला होता की, हे फूल माझ्या पूजेवेळी कधीच वापरू नये. तेव्हापासून ते आतापर्यंत केतकीचे फूल शंकराला वाहिले जात नाही.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.