सार
सिगारेट पिण्यामुळे अनेक आजार होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. ‘धूम्रपान प्राणघातक आहे’ हे माहित असूनही लोक ही सवय सोडत नाहीत. सरकारे तंबाखूविरोधी मोहिमा राबवतात, परंतु तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालत नाहीत. जगातील काही देशांमध्ये धूम्रपानावर पूर्णपणे बंदी आहे. धूम्रपान करणाऱ्यांसाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. चला, कोणत्या देशांमध्ये धूम्रपानावर बंदी आहे ते जाणून घेऊया.
भारताचा शेजारी देश भूतानमध्ये धूम्रपानावर पूर्णपणे बंदी आहे. येथे २०२४ पासून धूम्रपान गुन्हा मानला जातो. भूतानमध्ये धूम्रपान करणे कायद्याने निषिद्ध आहे. कोलंबियामध्येही धूम्रपानावर बंदी आहे. २००९ पासून कोलंबियामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. आपल्या देशातदेखील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी आहे.
आणखी वाचा- मुलांच्या फोन वापरण्याच्या सवयीमुळे होतात नकारात्मक परिणाम, जाणून घ्या काय होत?
या देशांमध्ये कठोर नियम
धूम्रपानावर बंदी घालणाऱ्या देशांमध्ये कोस्टा रिका देखील समाविष्ट आहे. २०१२ पासून या देशात धूम्रपानावर पूर्णपणे बंदी आहे. मलेशियामध्ये धूम्रपानावर कठोर नियम आहेत. येथे रुग्णालये, विमानतळे आणि सरकारी कार्यालयांमध्ये धूम्रपान पूर्णपणे निषिद्ध आहे. या ठिकाणी धूम्रपान केल्यास २ लाख रुपये पर्यंत दंड आणि २ वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते.
अलीकडे या देशात बंदी
धूम्रपानावर बंदी घालणाऱ्या देशांच्या यादीत अलीकडे एक नवीन देशाचा समावेश झाला आहे. इटलीने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घातली आहे. ही बंदी १ जानेवारी २०२५ पासून लागू झाली आहे. इटलीची राजधानी मिलानमध्ये जर कोणी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळले, तर त्याला ४० ते २४० युरो (भारतीय चलनात अंदाजे ३५०० ते २१००० रुपये) दंड भरावा लागेल.
काही इतर देशांमध्ये…
जगभरातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. यामध्ये नॉर्वे, न्यूझीलंड, स्वीडन, स्कॉटलंड, आयर्लंड यांसारखे देश समाविष्ट आहेत. आयर्लंड, झिम्बाब्वे, युगांडा, स्वीडन या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. फिनलंड आणि आइसलँड या देशांमध्ये रेस्टॉरंट आणि बारमध्ये धूम्रपान करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
आणखी वाचा- सर्दी-खोकला एका दिवसात होईल गायब, करा हे 3 रामबाण उपाय
कर्करोगाचा धोका…
अनेक अभ्यासांतून हे स्पष्ट झाले आहे की, धूम्रपानाची सवय आरोग्यावर गंभीर परिणाम करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका २० पटीने वाढतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे धूम्रपान. अलीकडे झालेल्या एका संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. धूम्रपान करणाऱ्यांचे आयुष्य हळूहळू कमी होत जाते.
संशोधनातील निष्कर्ष:
• एक सिगारेट पुरुषांचे आयुष्य १७ मिनिटांनी कमी करते.
• महिलांमध्ये, एक सिगारेटमुळे २२ मिनिटांनी आयुष्य कमी होते.
• 1996 मध्ये महिलांमध्ये दररोज सरासरी १३.६ सिगारेट सेवन केल्या जात होत्या.
• आकडेवारीनुसार, आता सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या