सर्दी-खोकला एका दिवसात होईल गायब, करा हे 3 रामबाण उपाय

| Published : Jan 10 2025, 01:12 PM IST / Updated: Jan 10 2025, 01:13 PM IST

home remedies for cough and cold

सार

सध्या थंडीचे दिवस सुरू असून सर्दी-खोकल्याचा बहुतांशजणांना त्रास सुरू होते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.

Remedies for Cough and Cold : थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला होणे सामान्य बाब आहे. यापासून दूर राहण्यासाठी शरिराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे फार गरजेचे असते. आयुर्वेदानुसार, काही आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करुन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. जेणेकरुन सर्दी-खोकल्यासारखी समस्याही दूर राहण्यास मदत होईल.

हळदीचे दूध

आजी नेहमीच आपल्याला हळदीचे दूध पिण्याचा सल्ला देते. हळदीच्या दूधामधील पोषण तत्त्वे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. दररोज हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.

आलं आणि मध

आलं आणि मधाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असल्याने दररोज आलं आणि मधाचे सेवन करू शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होण्यास मदत होईल.

मुलेठीचा काढा

आयुर्वेदानुसार, मुलेठी घश्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळेच मोठमोठे गायक मुलेठीचे सेवन करतात. सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी मुलेठीचा काढा पिऊ शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

प्रवासानंतर पोट बिघडलेय? फॉलो करा या 4 टिप्स

हिवाळ्यात कोणता आहार घ्यावा? जाणुन घ्या सोपा डाएट प्लॅन