सार

अंडरगार्मेंट्स खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर चुकीच्या साइज किंवा आकाराच्या अंडरगार्मेंट्स खरेदी केल्यास आरोग्यासंबंधितही समस्या उद्भवू शकतात. 

Lingerie buying tips : लॉन्जरी खरेदी करताना आपल्या शरिराचा आकार आणि आउटफिट्स कोणते आहेत याकडे लक्ष द्यावे. अन्यथा चुकीच्या पद्धतीच्या अंडरगार्मेंट्सची खरेदी केल्यास त्वचेवरच नव्हे तर आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो. जाणून घेऊया अंडरगार्मेंट्स खरेदी करताना कोणत्या चुका करणे टाळावे याबद्दल सविस्तर...

योग्य साइज निवडा

अंडरगार्मेंट्सची योग्य साइज असणे फार महत्वाचे असते. अंडरगार्मेंट्स अधिक घट्ट किंवा सैल असल्यास समस्या उद्भवू शकते. घट्ट अंडरगार्मेंट्समुळे शरिराचा आकार बिघडला जाऊ शकतो. याशिवाय अत्याधिक घाम आल्याने त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे अंडरगार्मेंट्स कधीच घट्ट अथवा अधिक सैल घेऊ नयेत.

योग्य कापडाची निवड

अंडरगार्मेंट्स खरेदी करताना त्याचा कम्फर्टनेस तपासून पहावा. जेणेकरुन त्वचेसंबंधित समस्या उद्भवणार नाहीत. लॉन्जरीसाठी मऊसर कापडाची निवड करावी. याशिवाय दररोजच्या अ‍ॅक्टिव्हिटी किंवा आउटफिट्सनुसारच अंडरगार्मेंट्स खरेदी करावेत.

ब्रेस्ट शेपनुसार खरेदी करा ब्रा

प्रत्येक महिलेची ब्रेस साइज वेगवेगळी असते. यामुळे ब्रा खरेदी करताना योग्य आकार आणि शेपनुसार निवडावी.

रंगाकडे लक्ष द्या

इनरवेअरच्या रंगाकडे देखील लक्ष द्यावे. लाइट आणि न्यूड रंगातील अंडरगार्मेंट्स खरेदी करावेत. यामुळे एखाद्या पातळ कपड्यांमध्येही इनरवेअरचा गडद रंग दिसून येणार नाही.

वेगवेगळ्या टाइपच्या लॉन्जरी खरेदी करा

प्रत्येक आउटफिट्सनुसार वेगवेगळ्या टाइपच्या लॉन्जरी खरेदी करता. जसे की, स्लिम फिटिंग पॅन्टसोबत स्लिमलेस अंडरवेअर परिधान करावी. याशिवाय बॅकलेस आउटफिट्समध्ये नॉर्मल ब्रा परिधान करू नका.

आणखी वाचा : 

कॉटन साडीवर परफेक्ट अशी 5 Afgani Style ज्वेलरी, खुलेल सौंदर्य

कॉर्पोरेट इवेंटवेळी दिसाल सुंदर, साडी खरेदी करताना करू नका या चुका