लालबागच्या राजाचे यंदा 92 वे वर्ष आहे. या मंडळाकडून दरवर्षी भाविकांसाठी सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध केली जाते.
Lalbaugcha Raja Day 1 Live Darshan : मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की सर्वप्रथम आठवण येते ती लालबागच्या राजाची. यंदा हा मानाचा आणि नवसाला पावणारा गणपती आपलं ९२ वे वर्ष साजरं करत आहे. लालबागचा राजा ही फक्त गणपतीची मूर्ती नसून भाविकांच्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि चमत्कारिक अनुभवांचं प्रतीक आहे.
१९३४ मध्ये मच्छीमार व कामगार वर्गासाठी गणेशोत्सव सुरू करण्यात आला आणि तेव्हापासून आजवर या मंडळाने आपल्या भव्यतेने आणि भक्तिभावाने एक वेगळाच ठसा उमटवला आहे. दरवर्षी लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये येतात. भाविकांना वाटतं की बाप्पा त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो, म्हणूनच त्याला "नवरत्नांचा राजा" किंवा "मनोकामना पुरवणारा राजा" असंही म्हणतात.
लालबागच्या राजाची मूर्ती उंच, भव्य आणि आकर्षक असते. सजावट, प्रकाशयोजना आणि सुवर्णसिंहासनामुळे बाप्पाचं रूप अधिकच मोहक दिसतं. गणेशोत्सवाच्या काळात इथे २४ तास दर्शनासाठी रांगा लागतात. दर्शनासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक येतात.९२ वर्षांचा हा प्रवास केवळ गणेशभक्तीचा नसून समाजकार्य, एकतेचा संदेश आणि श्रद्धेच्या बळाचा इतिहास आहे. लालबागचा राजा आजही भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
इंस्टाग्राम :
युट्यूब :

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X :


