यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी
Jyeshtha Gauri Avahana 2024 : जेष्ठागौरी आवाहनचे हिंदू धर्मात फार महत्व आहे. महाराष्ट्रात खासकरुन जेष्ठ गौरी आवाहन केले जाते. या दिवशी महिला उपवास ठेवण्यासह गौरीची पूजा करतात. यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी आणि शुभ मुहूर्तही जाणून घ्या.
| Published : Aug 31 2024, 03:54 PM IST
- FB
- TW
- Linkdin
जेष्ठागौरी आवाहन 2024
जेष्ठागौरी आवाहन महाराष्ट्रायीन महिलांमध्ये महत्वाचा सण मानला जातो. जेष्ठागौरी आवाहन देवी गौरी म्हणजेच देवी पार्वतीला समर्पित असतो. गणोशोत्सवादरम्यान, जेष्ठा गौरी आवाहन असते. खरंतर, तीन दिवस असणाऱ्या गौरी आवाहनच्या काळात महिला उपवास करण्यासह पूजा करतात. पूजेवेळी काही ठिकाणी नॉन-व्हेज अथवा शुद्ध शाकाहारी भोजनाचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो.
यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी?
यंदा जेष्ठागौरी आवाहन येत्या 10 सप्टेंबरला असणार आहे. यानंतर गौरीचे विसर्जन 12 सप्टेंबरला असून या दिवशी सहा दिवसांच्या गणपती बाप्पालाही निरोप दिला जातो.
शुभ मुहूर्त आणि विसर्जन
जेष्ठगौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबरला रात्री 08 वाजून 02 मिनिटांनी सुरु होणार आहे. यानंतर जेष्ठागौरीचे विसर्जन रात्री 09 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे.
जेष्ठागौरीचे महत्व
सुखी वैवाहिक आयुष्यासाठी महिला जेष्ठागौरीच्या वेळी पूजा केली जाते. यावेळी गौरीला सजवले जाते. पारंपारिक आभुषणेही घालण्यासह रांगोळी काढली जाते. देवीला वेगवेगळ्य प्रकारचा नैवेद्य दाखवली जाते. याशिवाय महिलांकडून पूजा-आरती केली जाते.
जेष्ठागौरी पूजा-विधी
- सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे.
- स्वच्छ वस्र परिधान करुन घराची स्वच्छता करावी.
- घलाला फुल आणि आंब्यांच्या पानांची सजवा आणि प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढा.
- जेष्ठागौरी आवाहनाच्या शुभ मुहूर्तावर गौरी घरी आणा.
- जेष्ठागौरीच्या वेळी पाण्याने भरलेल्या कलशावर नारळ ठेवा. याशिवाय गौरीचा श्रृंगार करा.
- गौरीची पूजा करुन झाल्यानंतर फळं आणि नैवेद्य अर्पण करा.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
गणपतीची पहिल्यांदाच घरी स्थापना करणार आहात? लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी
Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला दारापुढे काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी डिझाइन